संजीवनी युवा प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा: तालुक्यातील कर्तुत्ववान प्रतिभावानं व्यक्तींचा सन्मान
Sanjeevani Yuva Pratishthan Award Ceremony: Honoring talented and talented individuals of Taluka
संजीवनी युवा प्रतिष्ठान चा नववा वर्धापन दिनNinth Anniversary of Sanjeevani Yuva Pratishthan
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 13Jan 24, 18.40Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील कर्तृत्ववान, प्रतिभावान आणि तालुक्याला गौरव प्राप्त करून देणाऱ्या मान्यवरांचा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने नवव्या वर्धापन दिन विशेष कार्यक्रमात शुक्रवारी (१२) रोजी हा सन्मान कलश लॉन्स येथे करण्यात आला. या खास सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे होते.
प्रारंभी मांसाहेब जिजाऊ, स्वामी विवेकानंद व स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, गायन, नृत्य, क्रीडा आणि आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्यांचा सन्मान या सोहळ्यात राजेश मंटाला (पाणी प्रश्न), हेल्पिंग सीए. दत्तात्रय खेमनार (सामाजिक), विविध डॉ. मयूर तिरमखे (आरोग्य), अशोक भाकरे (कृषी), शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त अक्षय आव्हाड, (क्रीडा),‘ सारेगमप लिटिल चॅम्पस् २०२३’ गौरी पगारे, (गायन), पूजा गवळी,स्पर्धा परीक्षा (शैक्षणिक), नीलिमा नानकर स्पर्धा परीक्षा, (शैक्षणीक), ऋतुजा धनेश्वर (नृत्य विशारद), अमोल निर्मळ (परीक्षक) यांचा सन्मानचिन्ह शाल व बुके देऊन गौरव करण्यात आला आहे.
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, धार्मिक व पौराणिक वारसा लाभलेली कोपरगाव तालुका ही गुणवंतांची भूमी पुरस्कार विजेत्या बरोबर त्यांच्या पालकांचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. या सर्वांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांचा आदर्श युवा पिढीने घेतला पाहिजे.
स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा वारसा चालविण्याचा चालवताना चालविताना बिपिन दादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्षांपूर्वी संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना केली या माध्यमातून युवकांना हक्काचे व्यासपीठ मिळून दिले आहे. युवा सशक्तीकरण, सामाजिक एकता, कृषी, आरोग्य, पर्यावरण या पाच क्षेत्रात प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक सामाजिक बांधिलकी जपत नि:स्वार्थीपणे कार्य करत संकटकाळी जनतेच्या मदतीला धावून जाणाऱ्या आमच्या कार्याला समाजानेही हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करून, चला समाज परिवर्तन करूया, जग बदलूया, प्रगती करूया, असा संदेश त्यांनी दिला. गेल्या नऊ वर्षातील प्रतिष्ठानच्या कार्याचा चढता आलेख त्यांनी यावेळी मांडला. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यावर आधारित डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली. सूत्रसंचालन रामदास गायकवाड यांनी केले
यावेळी सोनेवाडी एमआयडीसी मंजुरीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या तसेच कोल्हे कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून महाराष्ट्रातील सर्वात नाविन्यपूर्ण कारखाना या पुरस्काराबद्दल प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी केला.
Post Views:
110