शिर्डी लोकसभेची जबाबदारी आता ॲड.संदीप वर्पे यांच्याकडे

शिर्डी लोकसभेची जबाबदारी आता ॲड.संदीप वर्पे यांच्याकडे

The responsibility of Shirdi Lok Sabha is now with Adv. Sandeep Varpe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 2Feb 24, 16.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : लोकसभा निवडणूका पुढील वर्षी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तयारी सुरू केली आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेसह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत नगर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे  जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे  यांच्यावर तेथील जबाबदारी सोपवली आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्यादृष्टीने मुंबई येथे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गटाच्या वरिष्ठ नेत्यांची  बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी, याकरिता मतदारसंघनिहाय निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशावरून शिर्डी लोकसभेसाठी ॲड. संदीप वर्पे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्त पत्र दिले आहे या पत्रात जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजवर आपण दिलेले योगदान लक्षात घेऊन आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी यापूर्वीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन आपणास शिडीं लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येत आहे. या मतदारसंघात सर्व तालुक्यांमध्ये संघटनात्मक नियुक्ती करणे, समविचारी पक्षाबरोबर बोलणी करणे इ. प्रकारची सर्व जबाबदारी आपणास देण्यात येत आहे.
आपण अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यातील दौरा करावा व स्थानिक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने संघटनेची रचना लक्षात घेऊन नियोजन करावे, भविष्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीनेही पूर्वतयारी करावी.पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी पण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास वाटतो. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.  शरद पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.असे नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्यावर सोपवण्यात आली आहे .
ॲड. संदीप वर्पे यांच्या नियुक्तीनंतर  कोपरगाव सह शिर्डी लोकसभा मतदारसंघातून  सर्व स्तरावर त्यांच्यावर   अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page