कोपरगावात ठिकठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कोपरगावात ठिकठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

The 75th Republic Day is being celebrated with enthusiasm at various places in Kopargaon

संजीवनी सैनिकीच्या पथकाने वेधले सर्वाचे लक्षSanjeevani Sainiki’s team attracted everyone’s attention

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 26Jan 24, 19.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : २६ जानेवारी हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात येथील तहसील कार्यालय मैदानावर साजरा करण्यात आला. तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार आशुतोष काळे, वरिष्ठ अधिकारी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिकांची उपस्थिती होती. संजीवनी सैनिकीच्या पथकाने ध्वजाला मानवंदना दिली.

 

पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

नगरपालिका येथे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,

तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संजीवनी इंजीनियरिंग कॉलेज, सहकार महर्षी कोल्हे कारखाना, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना, गोदावरी दूध संघ, संजीवनी दूध संघ, कोपरगाव औद्योगिक वसाहत, कोपरगाव जिनिंग प्रेसिंग, कोपरगाव रेल्वे स्टेशन, कोपरगाव एसटी बस आगार, कोपरगाव पोस्ट कार्यालय, सोमय्या कॉलेज, महिला कॉलेज, सद्गुरु गंगागीर महाराज कॉलेज, संत जनार्दन स्वामी कॉलेज, आत्मा मालिक शैक्षणिक संकुल सर्व मराठी शाळा इंग्लिश स्कूल, कॉलेजेस, बँका, पतसंस्था, पक्षांचे कार्यालय या ठिकाणी तेथील सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी मान्यवरांनी देशवासीयांना दिलेल्या शुभेच्छा

धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती अशा विविधतेने नटलेला आपला देश भारतीय संविधानामुळे व १३६ कोटी जनतेच्या देशप्रेमाच्या सामर्थ्यावर आजही एकसंघ आहे. संविधानाने आपल्याला अनेक अधिकार बहाल केले असले तरी देशाचे नागरिक म्हणून आपली देखील काही कर्तव्य असून ही कर्तव्ये सर्वांनी पार पाडावी. सामाजिक सलोखा जपून आपल्यामुळे इतर कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या.- आ आशुतोष काळे

विविधता, एकता आणि अखंडता हीच आपल्या भारत देशाची खरी ताकद आहे. रंग, रूप, वेश, भाषा जरी वेगळे असले तरी सर्व भारतीय बांधव असून, सर्वजण एक आहोत हा संदेश सर्व भारतीय आपल्या कृतीतून संपूर्ण जगाला देत असतात. मानवता हाच खरा धर्म असून, आपण सर्वांनी जातीय व धार्मिक सलोखा राखून सामाजिक एकोपा टिकवून ठेवला पाहिजे, – बिपीन कोल्हे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा, भारत देशाला आत्मनिर्भर व जगातील महाशक्तिशाली राष्ट्र बनविण्याचा ध्यास घेतला असून, समाजातील शेवटच्या माणसाचे भले कसे होईल, यासाठी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ हा मंत्र जपत ते समर्पित वृत्तीने देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे. जगातील सर्वात बलवान लोकशाही असलेला भारत देश आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.- स्नेहलता कोल्हे, माजी आमदार

Leave a Reply

You cannot copy content of this page