कोपरगावात ‘ज्याचा माल त्याचा हमाल’अंमलबजावणी न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- आयुब कच्छी
In Kopargaon, file a case against those who do not carry out ‘whose goods he carries’ – Ayub Kachhi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 2Feb 24, 16.10Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सरकारच्या धोरणानुसार संपूर्ण तालुक्यात ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष आयुब कच्छी यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन यांना गुन्हे करण्याचे निवेदन देण्यात आले आहे .
राज्य शासनाच्या ६ सप्टेंबर २०१६ रोजी अध्यादेश काढला होता परंतु कोरोना काळामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही सदर परिपत्रकानुसार हमाली वराई ज्याचा माल असेल त्यांनीच देणे अनिवार्य आहे. मात्र असे असूनही व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती हे हमाली वाहन मालकांकडून वसूल करतात. याविषयी वारंवार कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे शहर कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन , कृषी उत्पन्न बाजार समिती यांना निवेदन दिले होते. परंतु तरीही अवैध हमाली वराई घेणे बंद झाले नाही म्हणून कच्छी यांनी संपूर्ण तालुक्यात ज्याचा माल त्याचा हमाल या निर्णयाची घोषणा केली आहे, त्या अनुषंगाने आम्ही ट्रक व्यावसायिक आहोत आमचा माल ने आण करण्याचा व्यवसाय आहे , ट्रक मध्ये माल भरणे उतरविणे हे व्यापारी व हमाल यांचे काम आहे. परंतु माथाडी च्या नावाखाली वराई हि ट्रकवाल्याकडून जोर जबरदस्तीने अवैध रित्या घेतली जात होती, याबाबत कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोशिएशन च्या पाठपुराव्यामुळे तालुका दंडाधिकारी यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस आदेश काढला होता.
त्यावर कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांनी सर्व व्यापारी, हमाल यांना पत्र दिले होते.परंतु व्यापारी, व हमाल त्या आदेशाचे पालन करत नव्हते त्यासंदर्भात आम्ही व राज्यातील विविध संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केला.त्यावर काल १६ जानेवारी २०२४ रोजी पणन संचालनालय पुणे यांनी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, औद्योगिक वसाहती, यांना पत्र काढले तर त्यात त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे की अशी अवैध वराई वसूल करणा-यां वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल.व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कोणी तक्रार दाखल केली तर संबंधित व्यापारी याचे अनुज्ञप्ती (लायसन्स) रद्द करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे आमच्या लढयाला व पाठपुराव्याला यश मिळाले होते असे कच्छी यांनी सांगितले.
याबाबत शुक्रवारी (दि २) रोजी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव कोपरगाव शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तसेच तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना येथून पुढे अवैध वराई घेणाऱ्या व्यापारी, औद्योगिक कारखानदार व हमाल यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले
हमाली वराई कोणत्याही व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांना वाहन मालकांकडून वसूल करू देणार नाहीत, ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ हा निर्णय घेण्यात आला. जर कोणताही व्यापारी, उद्योजक, कृषी उत्पन्न बाजार समिती वाहन मालकांना हमाली देण्यास वेठीस धरत असेल, तर वाहन मालकाने, चालकाने कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोशिएशनकडे
संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष आयुब कच्छी,शैलेश रावळ, प्रकाश घोडके, वसीम भैय्या, सचिन सोनवणे, विशाल पवार, योगेश वाळूंज,नंदू वाळूंज,मंटू सोनवणे, सलीम शेख, गौतम बोधक, गणेश मोरे,तोसिफ अत्तार, उमेश महाजन, आदीसह बहुसंख्य चालक मालक ट्रान्सपोर्ट सभासद हजर होते.
उपस्थित होते.
Post Views:
93