राष्ट्रीय सेवा शिबिर: देशाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव होते – चैताली काळे 

राष्ट्रीय सेवा शिबिर: देशाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव होते – चैताली काळे 


National Service Camp: Realize your responsibility towards the country – Chaitali Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 5 Feb 24, 18.40Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव :आयुष्यातील आपले इच्छित ध्येय गाठण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून समाज व देशाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव होत असून समाजाशी एकरूप कसे व्हायचे याची शिकवण मिळत असल्याचे प्रतिपादन सौ.चैताली काळे यांनी केले. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब कुऱ्हाडे होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना व सौ. सुशीलामाई काळे  महाविद्यालय यांच्या  मढी खु. येथील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात चैताली काळे बोलत होत्या. 

चैताली काळे म्हणाल्या की, या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होवून विद्यार्थ्यांमध्ये नियोजनात्मक कला विकसित होते. निवासी शिबिरातून सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. त्यांना समाजासोबत मिळून मिसळून राहायची व श्रम संस्कारातून समाजाशी एकरूपहोण्याची शिकवण मिळते व या समाजसेवेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी काळे कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, सुनील बोरा, मोहनराव आभाळे, श्रीधर आभाळे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सौ.वैशाली आभाळे, उपसरपंच सौ.लिना आभाळे, बीपीनराव गवळी, रविंद्र आभाळे, सौ.गायत्री गवळी, सौ.मनीषा आभाळे, भीमाजी माळी, सुखदेव भागवत,आबासाहेबआभाळे, प्रमोद आभाळे, किरण आभाळे, अशोक आभाळे,भरत आभाळे, आनंदा गवळी, सुधाकर कुऱ्हाडे, पुंजाजी गवळी, पोपट दुशिंग, सुभाष माळी, शिवाजीराव आभाळे, शंकरराव आभाळे, सौ. रुपाली आभाळे, सौ.अंजली आभाळे, सौ.अनिता आभाळे, रोहन आभाळे, धनंजय आभाळे, तेजस भागवत, आशुतोष आभाळे, प्रतीक आभाळे, सुमित आभाळे, नारायण आभाळे, ग्रामसेवक किरण राठोड,  प्राचार्या डॉ. सौ.विजया गुरसळ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सागर मोरे यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष जाधव यांनी मानले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page