शासकीय योजनांचे दीड कोटीचे १११६ प्रस्ताव; आमदारांच्या  बैठकीअभावी धूळखात पडून! विवेक कोल्हे 

शासकीय योजनांचे दीड कोटीचे १११६ प्रस्ताव; आमदारांच्या  बैठकीअभावी धूळखात पडून! विवेक कोल्हे 

1116 proposals worth one and a half crores of government schemes;  Due to the lack of meeting of MLAs, falling into the dust!  Vivek Kolhe

चालढकल खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल… Behavior will not be tolerated; Harsh words to the officials…

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 5 Feb 24, 18.30Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव:  आमदारांनी गेल्या सहा महिन्यापासून बैठक न घेतल्यामुळे विविध शासकीय योजनेचे दीड कोटी रुपयाचे  १११६  प्रस्ताव मंजूरीसाठी  तहसील कार्यालयात धुळखात पडून असल्याचा  घणाघाती आरोप युवा नेते विवेक कोल्हे यांनी केला. 

हा निधी विनाकारण अडवून ठेवण्यात आल्याने तालुक्यातील विविध योजनेतील १११६ लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत. येत्या१९फेब्रुवारी शिवजयंतीपर्यंतचा अल्टीमेटम देवून तात्काळ त्या वंचितांना लाभ देण्यात यावा  अशी जोरदार मागणी युवा नेते विवेक कोल्हे यांनी केली. 

सोमवारी (दि ५) रोजी तहसील कार्यालय येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक पार पडली.

शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या 
 संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी आ. काळे यांची नोव्हेंबर २०२३ मध्ये नियुक्ती झाली. मात्र, तेव्हापासून त्यांनी कोणतीही बैठक न घेतल्याने संजय गांधी निराधार योजन इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, श्रावण बाळ योजना व इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातून  १११६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत ; परंतु आमदारांना बैठक घेण्यास वेळ नसल्याने त्या अभावी  ते धूळ खात पडले आहेत. त्यामुळे शासनाच्या दीड कोटी रुपयांच्या अनुदानापासून १११६ लाभार्थी वंचित आहेत. काही प्रस्ताव मंजुरीसाठी बैठकीची आवश्यकता नसतानाही तहसीलदारांनी अद्याप सदर प्रस्ताव मंजूर केले नाहीत. ठपका देखील विवेक कोल्हे यांनी ठेवला.
 तालुक्यात अनेक प्रश्न गंभीर बनले असताना आमदारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांवर त्यांचा अजिबात वचक राहिलेला नाही. प्रशासनात भ्रष्टाचार बोकाळला असून, स्वस्त धान्याचा काळाबाजार होत आहे. ऑनलाईन प्रक्रिया व नवीन रेशनकार्ड वाटप केले जात नाही.  कोपरगाव मतदारसंघासाठी ३ हजार कोटीचा निधी आणल्याच्या खोट्या वल्गना करणाऱ्या आमदारांना बैठक घेऊन गोरगरिबांचे प्रस्ताव मार्गी लावण्यास वेळ मिळत नाही हे दुर्दैव आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे अनेक लाभार्थी अनुदानापासून वंचित असल्याची टीका विवेक कोल्हे यांनी केली .
 तालुक्यातील दोन हजारांवर शेतकऱ्यांना सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. घरकुल योजनेअंतर्गत अनेक गरजू नागरिकांना अजूनही घरकुल मिळालेले नाही. आतापर्यंत दर महिन्याला समस्या सुटण्यासाठी १७ वेळा बैठका घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न व समस्या प्रशासनाकडे मांडत आहोत; पण अधिकारी कुणाच्या दबावात चालढकलपणा करत आहेत. सरकार विविध योजनांवर कोट्यवधींचा खर्च करत असतानाही योजना लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीत याला कोण जबाबदार ? प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येणाऱ्या अधिकाऱ्यांना विवेक कोल्हे यांनी खडे बोल सुनावले …मागण्या त्वरित पूर्ण करा,प्रश्न तात्काळ सोडवा; यात चालढकलपणा खपवून घेणार नाही असा सज्जड दम विवेक कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत ही विवेक कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी विवेक कोल्हे  यांनी नागरिकांचे प्रलंबित विषय सर्व मार्गी लागले पाहिजेत असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
या बैठकीस अप्पर तहसीलदार विकास गंबरे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, राजू चौरे, शरद थोरात,  बाजार समिती सभापती साहेबराव रोहोम, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास रहाणे, शहराध्यक्ष दत्ता काले, केशव भवर, मच्छिंद्र टेके, संभाजी रक्ताटे, रवींद्र पाठक,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, सरपंच रवींद्र आगवन, दीपक चौधरी, अनुराग येवले, प्रदीप चव्हाण, बाळासाहेब पानगव्हाणे, उपसरपंच भगवानराव चव्हाण, जितेंद्र रणशूर, शफिक सय्यद, रवींद्र रोहमारे, सतीश रानोडे, भाऊसाहेब वाघ, गोरख टुपके, उल्हास पवार, उत्तमराव चरमळ, अंबादास पाटोळे, वसंतराव गायकवाड, संजय भवर, खलिक कुरेशी, सिद्धांत सोनवणे यांच्यासह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page