संस्कृती महाराष्ट्राची ” कलाविष्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती चे घडले दर्शन -आ आशुतोष काळे
Culture of Maharashtra “The vision of tradition and culture of Maharashtra through art – Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 20 Feb 24, 19.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : जात्यावरच्या ओव्या, भूपाळी, भारुड, गवळण, मंगळागौर महाराष्ट्रात साजरे केले जाणारे विविध सणसमारंभ व उत्सवाची झलक पोवाडे, शिवराज्यभिषेक सोहळा, शेतकरी, ग्रामीण भागाच्या चालीरीती व समृद्ध परंपरा व संस्कृतीचे दर्शन “संस्कृती महाराष्ट्राची” या कलाविष्कारातून सादर करण्यात आली. या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडले. असे गौरवोद्गार आ आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाने कोपरगावकरांची मने जिंकली. “संस्कृती महाराष्ट्राची ” कार्यक्रमात यामुळे उत्तरोत्तर रंगत येत गेला.
औचित्य होते छ. शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती महोत्सवाचे. सोमवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्ण झाला
प्रारंभी आ.आशुतोष काळे यांनी हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती केली यावेळी फटाक्यांची आतषबाजी व जय भवानी, जय शिवाजी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
यावेळी आ आशुतोष काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ, मावळे फक्त यापुरतेच मर्यादित अजिबात नाही. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी सैनिकांना ताकीद देणारे ते शेतकऱ्यांचे कैवारी होते. स्त्रियांचा आदर आणि मानसन्मान करणारे व आपल्या मातेचा शब्द मानणारे आज्ञाकारी पुत्र होते. तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, बाजीप्रभू देशपांडे यासारखे अनेक हिरे जमवणाऱ्या महाराजांकडे माणसं ओळखण्याची कला होती. स्वराज्य निर्मितीबरोबर स्वराज्याचा गाडाही अतिशय व्यवस्थित चालवणारे महाराज कुशल प्रशासक देखील होते. त्यांच्या प्रेरणेतून कोपरगावच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली
Post Views:
41