कोपरगाव कृत्रिम अवयव, साधने वाटपासाठी मोफत नोंदणी, तपासणी शिबिर
Kopargaon Prosthetics, free registration for distribution of tools, inspection camp
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 20 Feb 24, 19.10Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबई, साधू वासवानी मिशन पुणे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,के.जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने कोपरगाव तालुक्यातील सर्व गरजू दिव्यांगांना आवश्यकतेनुसार लागणाऱ्या कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यासाठी मोफत नाव-नोंदणी व मोजमाप व तपासणी शिबिराचे आयोजन के.जे या कॉलेज येथे रविवारी (दि २५)फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
कोपरगाव मतदार संघातील कृत्रिम अवयव आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून मिळणार आहे.
रविवार रोजी होणाऱ्या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर तपासणीबरोबरच मार्गदर्शन देखील करणार आहेत. तपासणी नंतर ज्या दिव्यांग बांधवांना आवश्यकतेनुसार काही कालावधीनंतर कृत्रिम हात-पायांचे वितरण करण्यात येणार आहे.
या शिबिरातून अपंग नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची मदत व नवी उमेद मिळवून देण्याचा आ.आशुतोष काळे यांचा प्रयत्न आहे.त्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे व दिव्यांग सेना नगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांनी केले आहे.नाव नोंदणीसाठी आ.आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाशी दिव्यांग बांधवांनी व त्यांच्या पालकांनी संपर्क करावा.
Post Views:
50