चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात हातोडा घालून पतीकडून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात हातोडा घालून पतीकडून पत्नीचा खून

Murder of wife by husband with hammer on head due to suspicion of character

आरोपी पतीला अटकAccused husband arrested

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon19 Feb 24, 19.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  चारित्र्याच्या संशयातून पतीने  पत्नी पुजा अरुण दाभाडे (वय २६ ) हिच्या डोक्यात हातोडा घालून खून केला आहे. ही घटना चांदगव्हाण रोडचे शिवरस्ता वळणावर जेऊर पाटोदा शिवारात दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास  घडली. पोलिसांनी पती अरुण रतन दाभाडे  याला ताब्यात घेतले आहे.        

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अरूण दाभाडे हा आपल्या पत्नी पूजाला चारित्र्याच्या संशयावरून वारंवार त्रास देत होता. सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास पूजा अरुण दाभाडे रा. जेऊर पाटोदा ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर ही ड्युटीवरुन जेऊर पाटोदा येथे घरी जात असताना आरोपी अरुण रतन दाभाडे रा. टिळेकर वस्ती येवला रोड कोपरगाव,  याने तिचे चारीत्र्यावर संशय घेवुन मयत  पूजा हिला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने तिचे डोक्यात हातोड्याने जबर मारहाण करुन जिवे ठार मारले आहे.  ज्या प्रकरणी मयत पूजा आईचे वडील  यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पती अरुण दाभाडे यांच्या विरोधात मयत पूजा  हिचे वडील किरण तुळशीराम पठारे (वय ६२)  धंदा मजुरी रा. जेऊर पाटोदा ता. कोपरगाव यांनी तक्रार दिली असून  सदर  तक्रारीवरून  अरुण  दाभाडे रा. यांच्या विरोधात गुरंन ७४/२०२४ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे, खूनाचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या हातोड्यासह अटक करण्यात आलेली आहे.
घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी शिरीष वमने तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी सपोनि, विश्वास पावरा, पोसई रोहीदास ठोंबरे भेट दिली असून प्रभारी चार्ज असलेले तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक  विश्वास पावरा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page