कोपरगाव तालुका पोलिसांनी दोन लाखाचा गुटखा पकडला, एकाला अटक एक दिवसाची पोलीस कोठडी
Kopargaon taluka police caught Gutkha worth two lakhs, one arrested and sent to police custody for one day
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 20 Feb 24, 19.20Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोळपेवाडी हनुमान नगर या रस्त्यावर कोपरगाव तालुका पोलिसांनी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन लाख १९ हजार रुपयांचा गुटखा व मारुती व्हॅगनार कार ताब्यात घेऊन एकाला अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे
अश्पाक मेहबूब मनियार (वय ३०), रा. १०५ हनुमाननगर मारुती सुझुकी व्हॅगनर क्रमांक एमएच ०१ वाय ए ०३४० मधून गुटखा नेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कोळी यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पाळत ठेवली. असता १९ फेब्रुवारी रोजी दहा वाजेच्या सुमारास कोळपवाडी ते हनुमानगनर रस्त्यावर जात असताना, पोलिसांनी त्याला पकडले.त्याच्या कारची तपासणी केली असता, त्यात वसीम चोपदार रा. दत्तनगर कोपरगाव याचे मालकीचा हिरा गुटखा व जर्दा, वाहन व मोबाईल असे एकुण २ लाख १९ हजार रुपयांचा गुटखा, दोन लाखांची कार, असा एकूण चार लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप कोळी, पोलीस उपनिरीक्षक समाधान भटवाल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, गजानन वांडेकर, सुरेश गागरे, पोना, विलास कोकाटे, अविनाश तमनर, पो.कॉ. अंबादास वाघ, अनिश शेख यांचे पथकाने केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर भा.द.वि.क.३२८,१८८,२७२,२७३,३४ सह अन्न सुरक्षा माणके अधिनियम २००६ चे कालम २६/२)(आय) (व्ही) ५९ प्रमाणे अशपाक मणियार व वसीम चोपदार या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निकाला अटक करण्यात आलेली असून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे तर दुसरा आरोपी वसीम चोपदार हा फरार झालेला आहे अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, यांनी दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी तालुका पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्रात प्रतिबंधीत केलेला गुटखा जर्दा बाळगणारे इसमांविरुध्द कडक कारवाई करणार असल्याचे सांगीतले.
Post Views:
188





