महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांचा राजीनामा, महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा
Resignation of Mahanand chairman Rajesh Parjane paves the way for transfer of Mahanand to NDDB
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 22 Feb 24, 09.00Am.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मंगळवारी महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. अशी माहिती महानंदा दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिले आहे. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत माहिती देताना राजेश परजणे यांनी सांगितले की, महानंद ही महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था मानली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं.मुंबई (महानंदा) या दुग्धव्यवसायातील व सहकारातील शिखर संस्थेच्या संचालक मंडळाची १३वी बैठक २० फेब्रुवारी २०२४ रोजी एन.के.एम.कार्यालय, चर्चगेट, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. महानंदची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती असल्याने तिचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.
महानंदचे संचालक मंडळ बरखास्त करून पूर्ण कारभार एनडीडीबीकडे द्यायचा की, संचालक मंडळ कायम ठेवून कारभार एनडीडीबीकडे द्यायचा, असे दोन प्रवाह संचालक मंडळात होते. पण, एनडीडीबीने संचालक मंडळ बरखास्त करून पूर्णपणे कारभार आमच्याकडे द्या, अतिरिक्त कामगार कमी करा, अशा दोन प्रमुख अटी ठेवल्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून पूर्ण कारभार एनडीडीबीकडे देण्याचा ठराव करण्यात आला. कामगारांच्या स्वेच्छा निवृत्ती बाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतरच महानंद एनडीडीबीकडे दिले जाण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.अशी माहिती दिली
मंगळवारी महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यातून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांचे हितसंवर्धन होण्याच्या दृष्टीकोनात दूध महासंघाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरण करण्याचे नियोजित आहे. याबाबतचा विस्तृत डीपीआर रा.दु.वि. मंडळाने तयार केला आहे. रा.दु.वि. मंडळाने शासन व महानंदाला सादर केलेल्या प्रस्तावानुसार रु. २५३.५७ कोटी
इतकी रक्कम शासनाकडून मदत, soft loan किंवा भागभांडवल स्वरुपात देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात यावा, असा बैठकीत निर्णय घेण्यात आला. यातून कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती तसेच महानंदची विद्यमान यंत्रणा/व्यवस्था वर्धीत करण्यासाठी सदर निधी आवश्यक आहे. रा.दु.वि.मंडळाच्या अहवालानुसार विद्यमान संचालक मंडळ हे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या कारभारात हस्तक्षेप करणे अपेक्षित नाही. यास्तव सदरहून बैठकीत महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे आ. माणिकराव कोकाटे व इतर १५ असे एकूण १७ संचालकांनी संचालक पदाचे राजीनामे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक कान्हुराज बगाटे यांच्याकडे सुपूर्द केला आहे असे सांगितले.
चौकट
पुरेसे दूध संकलन आणि वितरणा अभावी आर्थिक अडचणींच्या खोल गर्तेत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई म्हणजेच महानंदच्या संचालक मंडळाने महानंद राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला (एनडीडीबीला) चालविण्यासाठी द्यावे, असा ठराव करून सरकारला पाठविला आहे. त्यामुळे केवळ कार्यक्षम कारभाराच्या अभावामुळे एकेकाळी राज्याचे वैभव असलेली महानंद डेअरी एनडीडीबीच्या घशात जाणार, हे स्पष्ट झाले आहे.
चौकट
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महानंदा डेअरीच्या ताब्यात घेतल्यावर प्रश्न उपस्थित करत सरकारने आधी या कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे सांगितले. राज्य सरकारने ज्या प्रकारे महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प शेजारील राज्य गुजरातकडे हस्तांतरित केले, त्यावरून सरकार शेजारील राज्याची बाजू घेत असल्याचे दिसते. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, महानंदा डेअरीच्या ताब्यातून अमूलसाठी मार्ग मोकळा होत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आणि वितरकांनी केला आहे.
Post Views:
163