नितीन कोल्हे यांना बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ जीवन गौरव पुरस्कार

नितीन कोल्हे यांना बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ जीवन गौरव पुरस्कार

Balasaheb (Brother) Devram Vagh Jeevan Gaurav Award to Nitin Kolhe

ऑटोनॉमस, मेंटाॅर इन्स्टिट्यूट्स दर्जासह स्थापित केलेल्या किर्तिमान याची दखल  Recognition of established track record with status of autonomous, Mentor Institutes

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 21 Feb 24, 13.50Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : संजीवनी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांना असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ इंजिनिअरींग काॅलेजेस, असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ पाॅलीटेक्निक्स आणि असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ ॲग्रीकल्चर अँड अलाईड ॲग्रीकल्चर कॉलेजेस काॅलेजेस (महाराष्ट्र) या तीनही संस्थांच्या वतीने त्यांना पुणे येथे शानदार सोहळ्यात
यंदाचा बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात होते.

माजी गृह राज्य मंत्री सतेज पाटील, चिपळूनचे आमदार शेखर निकम व संघटनेचे अध्यक्ष समीर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, मानपत्र असे आहे.

संजीवनी पाॅलीटेक्निकनेही नितिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कीर्तिमान स्थापित केले आहेत. यात संजीवनी पाॅलीटेक्निकने नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडीटेशन,नवी दिल्ली कडून सलग ९ वर्षे एनबीए हे सर्वोच्च मानांकन प्राप्त करून उच्चांक प्रस्थापित केला आहे. तसेच एआयसीटीईने या पाॅलीटेक्निकला इतर पाॅलीटेक्निक्सला एनबीए मानांकन प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये मेंटाॅर इन्स्टिटयूट म्हणुन नेमणुक केली. २०२१ मध्ये मेंटाॅर इन्स्टिट्यूट्सचा दर्जा प्राप्त करणारे भारतातील हे पहिले पाॅलीटेक्निक ठरले. तसेच आपल्या विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यातही आघाडी घेतली आहे.
नितिन कोल्हे यांनी एसजीआयचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व पाॅलीटेक्निकमध्ये काळानुरूप अनेक धाडसी निर्णय घेतले आणि ते यशस्वी करून दाखविले. यात प्रामुख्याने उद्योग आणि तांत्रिकी शिक्षण यांच्यातील दुरी भरून काढण्यासाठी व समन्वय साधण्यासाठी संजीवनी इंनिनिअरींग काॅलेजला २०१९ साली ऑटोनॉमस दर्जा प्राप्त करून ग्रामीण भागातील दुसरे व उत्तर महाराष्ट्रातील ते पहिले ऑटोनॉमस काॅलेज ठरले. त्यामुळे उद्योग जगताला अभिप्रेत असलेल्या आधुनिक अभ्यासक्रमाचा समावेश अभ्यासक्रम रचनेत करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पहिली ऑटोनॉमस बॅच बाहेर पडली. यात महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने तब्बल ७७० नवोदित अभियंत्यांना रू २० लाख वार्षिक पॅकेज पर्यंतच्या नोकऱ्या नामांकित कंपन्यांमध्ये देण्यात आल्या. यापुर्वीही ग्रामीण भागातील अनेक अभियंत्यांना चांगल्या पगाराच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने आपल्या विध्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक घडामोडींचे अवलोकन होवुन त्यांच्यात बदल घडवुन आणन्यासाठी अनेक परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत.या सर्व परिपाक याचे हे फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page