जय जय महाराष्ट् माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ! म्हणत  दिमाखात शिवजयंती सोहळा!  

जय जय महाराष्ट् माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ! म्हणत  दिमाखात शिवजयंती सोहळा!

Jai Jai Maharashta maja, Garja maharashtra maja! Saying Shiv Jayanti celebration in Dimakha!

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 22 Feb 24, 09.10Am.By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अनुसरुन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव शहरात शिवजन्मोत्सवानिमित्त शाहिरी शिवदर्शन’ व लोकगीतांच्या कार्यक्रमाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा” ‘गर्जा महाराष्ट्र माझा! म्हणत  दिमाखात  करण्यात आली !

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमांना पुष्पहार व नमन करण्यात आले.  महाराष्ट्रात गाजलेल्या शाहीर रामानंद उगले यांचा “शाहिरी शिवदर्शन” पोवाडा व मराठी परंपरेच्या लोकगीतांचा कार्यक्रम मंगळवारी (दि२०)रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात घेण्यात आला.
टीव्ही स्टार युवा शाहीर रामानंद उगले यांच्या पहाडी व भारदस्त आवाजात वीररसाने ओतप्रोत भरलेला शिव पोवाडा ऐकून श्रोत्यांच्या अंगावर काटा आला.शिवरायांच्या मराठा मावळ्यांचा पराक्रम पुन्हा जिवंत झाला.
यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे,  रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, संजीवनी उद्योग समुहाशी संलग्न विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक तसेच शहर व तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की,  युगपुरुष, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श नीतिवंत राजे होते.  त्यांनी  महिलांचा आदर, सन्मान केला. केवळ एक दिवस शिवजयंती साजरी न करता  त्यांचे गुण व विचारांचे आचरण करण्याची आज खरी गरज आहे. आपण आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला महाराष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवणारे असे कार्यक्रम पाहण्यासाठी आणले पाहिजे कारण आता खरा इतिहास नामशेष होत चालला आहे व रचीत इतिहास व्हॉट्सॲप व इतर माध्यमातून दाखवला जात आहे. त्यामुळे वेळीच यासाठी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विवेक कोल्हे  म्हणाले की, शाहिरी शिवदर्शन’ व लोकगीतांच्या कार्यक्रमातून शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, अंगावर शहारे आणणारे स्फूर्तिदायक पोवाडे, शिव जन्मोत्सव साजरा झाला. ‘करतो वंदना गौरीनंदना’, शिवजन्माचा पोवाडा, दूध शिवबाला पाजणारी होती जिजाऊ वाघिण, जगदंबा मातेचा गोंधळ, प्रतापगडचा रणसंग्राम, नवरा माझ्या मुठीत, डोहाळे माझ्या हक्काचे, अंधार फार झाला इथे दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, गाडी घुंगराची आली आदी गीतांना रसिकांची भरभरून दाद मिळाली.  स्वराज्याच्या परंपरेचा इतिहास सांगणारा हा कार्यक्रम आहे. निश्चितच आपली परंपरा, आपले विचार, आपले धोरण ही त्रिसूत्रीच धर्माचे आणि परंपरेचे रक्षण करते. असे गौरव उद्गार व्यक्त केले .कोपरगावकरांनी भरभरून चांगला प्रतिसाद दिला त्यांचे मी आभार मानतो.
यावेळी विवेक कोल्हे यांनी युवा शाहीर रामानंद उगले,व त्यांच्या सर्व सहकारी  कलाकारांचा सत्कार केला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, त्यांच्या दोन्ही सुना रेणुका कोल्हे व श्रद्धा कोल्हे यांनी महिला वर्गात बसून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला. तर राहील आवाज वाघाचा’  या गाण्यावर विवेक कोल्हे यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत शानदार नृत्य केले.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त २२ जानेवारी रोजी  संजीवनी महिला बचत गट आयोजित  ‘घर ते रांगोळी’ स्पर्धेतील विजेत्या महिलांना  स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पैठणी, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन रामदास गायकवाड तर प्रास्ताविक सिद्धार्थ साठे यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page