चोपडा – पुणे बसमध्ये सापडला सव्वा लाखाचा गांजा

चोपडा – पुणे बसमध्ये सापडला सव्वा लाखाचा गांजा

Half a lakh worth of ganja found in Chopra-Pune bus

कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल घटना चोपडा-कोपरगाव दरम्यानA case has been registered in the Kopargaon police. The incident occurred between Chopra and Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 22 Feb 24, 10.00Am.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : चोपडा – पुणे या बसमध्ये
सुका गांजा असलेली बेवारस बॅग आढळून आली. या बेवारस बॅगची कोपरगांव पोलिसांनी तपासणी केली असता त्यात सुमारे १ लाख २२ हजार रुपये किमतीचा साडे १२ किलो गांजा आढळून आला. चोपडा-कोपरगाव दरम्यान आरोपीने बॅग ठेवली असावी

याप्रकरणी कोपरगाव बस आगाराचे अविनाश विष्णुपंत गायकवाड (वय ४८) सहाय्यक वाहतूक निरीक्षक कोपरगाव आगार राहणार ओमनगर कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांनी व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत कायदेशीर कारवाई केली. पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरोधात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता चोपडा पुणे बस क्रमांक MH १३ CU ८४७५ ही गाडी कोपरगाव बस आगारात आली असता सदर गाडीत बिघाड झाल्याने वाहकाने ती गाडी कामासाठी कोपरगाव डेपो घातली त्यानंतर तिथे गाडी पंचर झाले त्याचे लक्षात आले गाडीला गाडीच्या कामाला वेळ लागणार असलेले वाहकाने सर्व प्रवाशांना दुसऱ्या गाडीने बसून दिले तीन-साडेतीन वाजता सर्व प्रवाशांना बसून दिल्यानंतर गाडीत एक बॅग राहिल्याचे वाघाच्या लक्षात आल्याने त्यांनी चौकशी केली परंतु कोणीही त्या ठिकाणी मिळून आले नाही त्यांनी ही गोष्ट आगारप्रमुखांच्या कानावर घातली गाडी डेपो मध्ये घातल्याचे पाहून अज्ञात आरोपीने भितीपोटी वरील अंमली पदार्थ गांजा असलेली राखाडी रंगाची बैंग त्यावर BAG GEAR असे लेबल असलेली त्यात काळया रंगाचा टि शर्ट त्याचे कॉलरजवळ BALLUCCI असे लेबल राखाडी रंगाची जिन्स पेन्ट त्याचे कमरेजवळ Running Machine असे लेबल असलेली सदर बसमध्ये सोडुन निघुन गेला आहे.
शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे पुढील तपास करीत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page