बाळासाहेब रहाणेंचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
Balasaheb Rahane’s ‘Jai Maharashtra’ to Thackeray Group
तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा : शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता Resignation of Taluka Pramukh: Shinde’s possibility to join Shiv Sena
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 22 Feb 24, 10.10Am.By राजेंद्र सालकर
कोपरगाव: कोपरगाव उध्दव ठाकरे तालुका शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब रहाणे यांंनी आपल्या पदाचा बुधवारी (दि २१) रोजी राजीनामा दिला आहे.
त्यांनी कौटुंबिक कारण देत राजीनामा पक्ष प्रमुखांकडे पाठविला असल्याचे पत्रकातून म्हटले आहे. अकरा दिवसापूर्वी नितीन औताडे यांनी (दि १०) रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या चार दिवस अगोदर अंतर्गत अंतर्गत गटबाजीचे कारण देत तडकाफडकी आपल्या जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा दिला होता व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी मुंबई येथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतरच नितीन औताडे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे तालुकाप्रमुख बाळासाहेब रहाणे यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
बुधवारी १४ तारखेला शिवसेनाप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रा मेळावा कोपरगावात मोठ्या उत्साहात पार पडला त्याप्रसंगी बाळासाहेब रहाणे व्यासपीठावर होते. त्यानंतर सातच दिवसात त्यांनी अचानक कौटुंबिक कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला गेल्या ३५ वर्षापासून ग्रामीण भागातीलएक सच्चा कडवा लढवय्या शिवसैनिक म्हणून बाळासाहेब रहाणे यांची ओळख होती. राजकीय जीवनात शिवसैनिक म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुकीत मोठा संघर्ष केला शिवसेनेचे बहाद्दरापूर येथील पहिले सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्याचबरोबर त्यांनी १९९७ मध्ये अखंड कोपरगाव तालुका असताना आजच्या राहाता तालुक्यातील अस्तगाव गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती त्यात त्यांना अपयश आले होते परंतु २०१७ च्या निवडणुकीत पंचायत समिती निवडणुकीत ते पोहेगाव गटातून विजयी झाले होते, यावेळी नितीन औताडे यांचे मोठे पाठबळ मिळाले होते. पक्षामध्ये काम करत असताना त्यांनी निळवंडे कृती समिती तसेच माजी खासदार सूर्यभान वहाडणे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव देशमुख उपसा जलसिंचन (उजनी चारी) संदर्भात सक्रिय आंदोलनात सहभाग घेतला होता.पक्षवाढीसाठी त्यांनी निष्ठेने काम करत सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. आपल्या कामामुळे पदाचे हक्कदार असताना सुद्धा त्यांनी कधीही पदाचा आग्रह धरला नाही किंवा त्यासाठी प्रयत्नही केले नाही पक्षाच्या नावाखाली त्यांनी ग्रामीण भागात सतत पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रामाणिकपणे संघर्ष केला होता बाळासाहेब रहाणे यांना तीन एक महिन्यापूर्वीच कोपरगाव तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख पद मिळाले होते यासाठी नितीन औताडे यांनीच त्यांचे नाव सुचवून राजकीय वजन वापरले होते. आज जरी बाळासाहेब रहाणे कौटुंबिक कारण देत असले तरी नितीन औताडे यांच्या राजीनामे नंतरच सतशील स्वभावाच्या बाळासाहेब रहाणे यांची घालमेल सुरू झाली होती त्यांच्यावर प्रचंड दबाव होता त्यामुळे ते आज ना उद्या राजीनामा देतील अशी अटकळ होतीच अखेर त्यांनी बुधवारी (दि२१ ) रोजी आपले कौटुंबिक कारण पुढे करीत पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे पाठवून दिल्याचे पत्र प्रसिद्ध केले. लवकरच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यास नवल वाटायला नको तूर्तास त्यांची भूमिका स्पष्ट होईपर्यंत यावर बोलणे योग्य होणार नाही ग्रामीण भागातील आणखी एक मोठा पदाधिकारी पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे चर्चा सुरू आहे बाळासाहेब रहाणे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे.
Post Views:
206