अलंकापुरीनगरी येथे गोवर्धन लीला भागवत कथेच्या ५ व्या दिवशी सांगितली.
On the 5th day of the Bhagwat story told to Govardhan Lee at Alankapurinagri.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 23 March 24, 19.00 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : श्रीमद भागवत कथेत गोवर्धन लीलेचे वर्णन करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले – जेव्हा इंद्र क्रोधित झाला आणि ब्रजचा नाश करू इच्छित होता तेव्हा वसुदेव भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले.
रामगिरी महाराज म्हणाले की, भक्ती हा पराकोटीचा मार्ग आहे. ईश्वरीय साधना मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखवते हे प्रत्येकाला समजत असुनही त्याची आवड निर्माण होत नाही त्यामुळे कलियुगात दिवसेंदिवस समस्या वाढत आहे.
भक्ताच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी भगवान परमात्मा सदैव तत्पर असतात मात्र त्यासाठी आपल्या मुखात त्याचे नामस्मरण आले पाहिजे. मनाला सुमन बनवा म्हणजे भगवंत त्यात वास करेल जीवन क्षणभंगुर आहे हे प्रत्येकाला ज्ञात होऊनही हाव सुटत नाही.
माया मनुष्याला एकमेकांच्या नात्यापासुन दूर करत असते तिच्या किती अधीन जायचे हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे. मायेच्या पलिकडेही वेगळी दुनिया आहे त्याच्या प्रवासासाठी साधना, नामस्मरण खुप महत्वाचे असते.
यशोदा मातेने भगवान श्रीकृष्णाला वात्सत्य दिले पण पुतना मावशीने शत्रुभाव दिला शेवटी भगवंताने त्या शत्रुभावाचा नाश केला. महर्षि वेदव्यासांनी श्रीकृष्ण भक्तीचा ग्रंथ श्रीमद भागवत लिहिला आहे. मनुष्याने अहंकार नष्ट करावा म्हणजे सद्गुणी विचार अधिक बलवान होतात. जसं कर्म असतं तसं फळ मिळतं असतं. काळ बदलला तशी साधनेही बदलली., मात्र आपल्याकडे वेळ भरपूर आहे ते जाणून घ्या.
यावेळी आत्मा मालिक, राघवेश्वर देवस्थान आदी पंचक्रोशीतील संत महंत मंडळींचे यावेळी ईशान बिपिन कोल्हे यांनी सपत्नीक संत पूजन केले.
ईशान कोल्हे व श्रध्दा कोल्हे यांनी रामगिरी महाराज यांचे संतपुजन व आरती केली.
वृंदावन येथुन आलेले कृष्णाजी महाराज यांनी बहारदार तांडव नृत्य करत भाविकांची मने जिंकली. गोवर्धन पर्वताची प्रतिकृती कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती, छोट्या मुलांना श्रीकृष्ण, पेंद्या, सुदामा अशा विविध रुपाने सजवून श्रोत्यांना मुक्त केले.
ग्रामीण भागातील वृद्ध मंडळी, वारकरी सप्रदाय, महिला, मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे. कार्यक्रम नियोजनात विवेक कोल्हे स्वतः जातीने लक्ष देत आहे.
Post Views:
53