श्रीमद भागवत कथेच्या ६व्या दिवशी श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह 

श्रीमद भागवत कथेच्या ६व्या दिवशी श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह 

Sri Krishna-Rukmini marriage on the 6th day of Srimad Bhagwat story

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 23 March 24, 19.10 Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव: कोपरगाव येथील अलंकापुरीनगरी  सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या सहाव्या दिवशी व्यासपीठावरून श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाची घटना सांगितली.  संसारात कसे वागावे, कशाचे भान राखावे याचा उपदेश बलरामाची पत्नी रेवती हिने श्रीकृष्णाची पत्नी रूक्मिणीला केल्यांने या स्वयंवरातुन संसारात वागण्याची शिकवण मिळते असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे (बेट सराला) गुरूवर्य महंत रामगिरी महाराज यांनी गुरुवारी (दि.२१) रोजी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या द्वितीय स्मरणानिमित्त कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने आयोजित आयोजित संगीतमय भागवत कथेचे सहावे पुष्प गुंफतांना केले. 

रामगिरी महाराज म्हणाले की, महारांसमध्ये पाच अध्याय आहेत.  त्यामध्ये गायलेली पाच गाणी म्हणजे भागवतांचे पाच जीवन.जो कोणी ही पाच गाणी  उत्कटतेने गातो तो अस्तित्वाच्या पलीकडे जातो.  त्यांना वृंदावनाची भक्ती सहज प्राप्त होते.
 कथेत भगवान मथुरेला निघून गेल्याची कथा, कंसाचा वध, महर्षी सांदिपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेणे, कालयवनाचा वध, उद्धव गोपी संवाद, उद्धवने गोपींना आपला गुरु बनवणे, द्वारकेची स्थापना आणि रुक्मिणी विवाहाचे संगीतमय व भावपूर्ण पठण करण्यात आले.”चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहु” या भजनाला भाविकांनी तल्लीन होत साथ दिली. वृंदावन येथील कृष्णाजी महाराज यांनी रूक्मीणी श्रीकृष्णाच्या होळीचा साक्षात परमानंद फुलांची होळी खेळून दिला, त्यांनी सादर केलेल्या प्रसंगावर उपस्थित भाविकांनी टाळयांच्या कडकडाटात दाद दिली. 
कथेदरम्यान रामगिरी महाराज  म्हणाले की, महारांसमध्ये भगवान श्रीकृष्णांनी बासरी वाजवून गोपींना बोलावले आणि महारास लीलेतूनच आत्मा आणि देव यांची भेट झाली.  जीव आणि ब्रह्माच्या भेटीला महारास म्हणतात.कलियुगात भगवंत चिंतन अत्यंत महत्वाचे आहे. आवड असल्याशिवाय सवड होत नाही तेंव्हा प्रत्येकांने देवाचे नामस्मरण अवश्य करावे, तो कलियुगात तरण्याचा अत्यंत सोपा मार्ग आहे. भगवंताचा वास जोपर्यंत अंतःकरणांत असतो त्यात विकारांना स्थान नसते 

चौकट

परमपूज्य नारायणगिरी महाराजांची१५ वि पुण्यतिथी श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सराला येथे दोन एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असून त्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महंत  रामगिरी महाराजांनी यावेळी बोलताना केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page