श्रीमद भागवत कथा ७ व्या दिवशी : जीवनात मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामासारखी असावी : रामगिरी महाराज

श्रीमद भागवत कथा ७ व्या दिवशी : जीवनात मैत्री श्रीकृष्ण आणि सुदामासारखी असावी : रामगिरी महाराज

Shrimad Bhagwat Story on Day 7 : Friendship in life should be like Shri Krishna and Sudama : Ramgiri Maharaj

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 23 March 24, 19.20 Pm.By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : माणसाच्या आयुष्यात कृष्ण आणि सुदामासारखे मित्र असतात.  म्हणून जीवनात मैत्री कृष्ण-सुदामासारखी असावी. असा संदेश  श्री गोदावरी धामचे (बेट सराला) गुरूवर्य महंत रामगिरी महाराज यांनी शुक्रवारी  (दि.२२) रोजी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या द्वितीय स्मरणानिमित्त कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने आयोजित आयोजित संगीतमय भागवत कथेचे सातवे पुष्प गुंफतांना दिला. 

रामगिरी महाराज यांनी  शुक्रवारी  कृष्णा-सुदामा मैत्रीची सविस्तर माहिती दिली.  ते म्हणाले कृष्ण-सुदामासारखी मैत्री असेल तर जगातील गरीब गरीब हा भेद दूर होईल.  देवाला त्याच्या भक्तांमध्ये उच्च किंवा नीच भावना दिसत नाही.  भगवान श्रीकृष्णाचा मित्र सुदामा हा अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंबातील होता.लहानपणांचा सवंगडी सुदामा दारिद्रयाने पिचला होता एके दिवशी सुदामाच्या पत्नीने  त्याला सांगितले की – द्वारकेचा राजा श्रीकृष्ण तुमचा मित्र आहे. पण भगवंताकडे आपण आपला कसा स्वार्थ साधायचा हे त्यांच्या बुध्दीला पटत नव्हते पण मैत्रभावाच्या नात्यांने सुदामांने भगवंत श्रीकृष्णांची भेट घेत त्यांचे ऐश्वर्य पाहुन मनांतील गोष्टी मनांतच ठेवल्या. श्रीकृष्णासाठी आणलेले पोहे आपल्याकडेच ठेवले पण भगवंत श्रीकृष्णांने त्याची ही भेट गोड मानून जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमचे दारिद्र्य दूर करून कृष्णाने आमचे सर्व दुःख दूर केले.  सुदामाला कृष्णाचे प्रेम आठवले.  कथेदरम्यान वृंदावन येथील कृष्णाजी महाराज यांनी रूक्मीणी श्रीकृष्णाच्या होळीचा साक्षात परमानंद फुलांची होळी खेळून दिला,  गायलेल्या भजनावर भाविकांनी जोरदार नृत्य केले.
सातव्या दिवशी बिपीन कोल्हे  व स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे व रेणुका कोल्हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
याप्रसंगी श्री १००८ महामंडलेश्वर काशिकानंद महाराज, पंचकोशीतील विविध संत महत,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
शेवटी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आभार मानले.

चौकट

श्रीमद भागवत कथा सांगता प्रसंगी लख्ख पडला प्रकाश  अंधारात हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने आसमंत उजळून निघाला यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी मेणबत्या पेटवत, सुवासिनींनी आरतीचे तबक घेत भगवंताची आरती केली. अंधारात हजारो दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने आसमंत उजळून निघाला.  

Leave a Reply

You cannot copy content of this page