भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन , महाप्रसाद  वाटप

भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन , महाप्रसाद  वाटप

On the last day of Bhagwat Katha, Kaliya Kirtan, distribution of Mahaprasad

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sun 24 March 24, 18.00 Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव येथील अलंकापुरीनगरी येथे स्व. शंकरराव कोल्हेंच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त  गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद भागवत कथेची  शनिवारी (दि २३) काल्याच्या कीर्तनाने  सांगता झाली.  कथेच्या शेवटच्या दिवशी  रामगिरी महाराज  यांनी कथेचा गोषवारा देत जीवन जगण्याची कलाही समजावून सांगितली.  अनेक उपदेशात्मक कथा सांगून त्यांनी भक्तांना मंत्रमुग्ध केले.

रामगिरी महाराज यांनी सांगितले की, माणसाला अनेक जन्मानंतर जीवन मिळते.  ते कसे जगले पाहिजे हे देखील समजावून सांगितले.  सूर्यदेवाकडून सत्राजितला भेट म्हणून मिळालेले रत्न, रत्न हरवल्यानंतर जामवंत आणि श्रीकृष्ण यांच्यातील २८ दिवसांचे युद्ध आणि त्यानंतर श्रीकृष्णाच्या आठही विवाहांची कथा सांगताना कथाकथन केले. जामवंती, सत्यभामा इ.  दुष्ट भौमासुराने बंदी बनवलेल्या १६ हजार १०० मुलींना भगवंतांनी कसे मुक्त केले आणि त्यांना आपली राणी बनवून मुक्त केले हे त्यांनी सांगितले. सुदामाचे चरित्र त्यांनी सविस्तरपणे सांगितले.  कृष्ण आणि सुदामा यांच्यातील प्रामाणिक मैत्रीचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की कृष्णाने गरीब सुदामाला कोणतीही विनंती न करता कसे वाचवले.  मैत्री टिकवून सुदामाची प्रकृती सुधारली.  गोहत्येला विरोध आणि गायींची सेवा करण्यावरही भर देण्यात आला.  कथा सांगता कार्यक्रमानंतर  महाप्रसाद वाटप करण्यात आला.  शेवटी, यजमान विवेक कोल्हे आणि ईशान कोल्हे यांनी कथा ऐकण्यासाठी आणि कथन भजन करण्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले.
यावेळी माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी उत्तुंग व्यक्तीमत्व, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देणं, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून काम करणं हा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा स्थायीभाव होता तो, राज्याच्या सदैव स्मरणांत राहणारा असल्याची भावना व्यक्त केली.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे  म्हणाल्या की, सप्ताहभर श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी भाविकांनी उच्चांकी गर्दीने सहभाग दिला हा आम्हा सर्व कोल्हे कुटुंबियांसाठी परमानंद आहे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा स्व. शंकरराव कोल्हे यांनी दिलेला वसा समर्थपणे पुढे चालवत आहोत. स्वामी सहजानंदभारती पासून थेट नारायणगिरी महाराजांपर्यंत सर्वच घटकांचा सहवास माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना लाभला हा आमसर्वांसाठी अमुल्य ठेवा आहे.
रमेशगिरी महाराज  म्हणाले की, अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची ओळख आहे. पितृ‌दोषाचे हरण करण्याचा कलीयुगातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीमद् भागवत होय.  समाजातील समस्यांचा शोध घेऊन त्याचे निवारण करणे ही स्वर्गीय शंकरराव कोल्हे  यांची खासीयत होती. 
याप्रसंगी राजेश्वरानंद महाराज, राघवेश्वर महाराज, दामोदरबाबा महानुभाव, कैलासानंद महाराज, मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिकच्या माजी सरचिटणीस निलीमा पवार,उद्योजक डॉ. मिलींद कोल्हे, कलावती कोल्हे, कृषी अभ्यासक दत्तात्रय कोल्हे, रविंद्र काळे,आ.किशोर दराडे,माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, श्रीराज डेरे, जालिंदर वाकचौरे,मा.आमदार राजाभाऊ वाजे,अमृताताई पवार,नितीन औताडे, डॉ.राजेंद्र पिपाडा,धनंजय जाधव, शिवाजीराव गोंदकर,नितीन कापसे, कमलाकर कोते,महेंद्र काले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page