रोहमारेंनी योग्य ठरवली आशुतोष काळे यांची भूमिका

रोहमारेंनी योग्य ठरवली आशुतोष काळे यांची भूमिका

Rohmare decided the role of Ashutosh Kale

दहा वक्राकार दरवाजे नगर नाशिक संघर्षाची ठिणगीTen Curved Doors Nagar Nashik Spark of Struggle

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 28 March 24, 20.00 Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांनी नांदूर मधमेश्वर येथे दहा वक्राकार  दरवाजे बांधण्याबाबत न्यायालयात आव्हान देण्याची जी भूमिका घेतली ती योग्यच असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचेअध्यक्ष अशोक रोहमारे यांनी कोपरगाव येथे दिली. गुरूवारी (ता२८) त्यांनी  प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

नाशिक जिल्ह्यातील गोदाकाठ भागातील १७ गावांना पूरपाण्याचा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो. त्यामुळे – नांदूरमध्यमेश्वर धरणाला १० वक्राकार दरवाजे  बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी समस्या या दरवाजांमुळे निकाली निघणार आहे. त्यामुळे गोदाकाठ भागातील जनतेत समाधान व्यक्त होत असतानाच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी मात्र या दरवाजांना विरोध सुरू केल्यामुळे गोदाकाठ भागातील जनता संतप्त झाली आहे. आ. काळे यांनी धरणाच्या दरवाजांना विरोध केल्यास जशास तसे उत्तर – देण्याचा इशारा निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. 
 याचा मुद्द्यावर अशोक रोहमारेंचही  म्हणणं आहे. हे  दरवाजे बसविण्याचा  हा निर्णय गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर अन्याय करणारा असून आमच्या पाण्याला  धक्का बसू नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
नांदूर मधमेश्वर धरणावर दहा वक्राकार दरवाजे बसविण्यावरून नाशिक गोदाकाठ  नेते व आमदार  आशुतोष काळे आमने-सामने आले आहेत. त्यावर बरच राजकारणही होतेय.
दरवाजे टाकल्यामुळे जनतेचा पुरप्रश्न निकाली निघणार असताना आ. काळे यांनी विरोध केला तर गोदाकाठ भागातील जनता शांत बसणार नाही. कोपरगाव तालुक्याला दिले जाणारे पाणी रोखूण्यात येईल, असा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
 त्यासंदर्भात विचारल्यानंतर रोहमारे म्हणाले की, बारमाही ब्लॉकच्या नावाखाली लँड सिलींग कायद्यान्वये जास्तीच्या जमिनी गेल्या व ५० टक्के ब्लॉक्स देखील रद्द करून गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय झाला आहे. १० वक्राकार दरवाजे बांधण्यास मंजूरी दिल्यामुळे गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. बंधाऱ्यात साचलेला गाळ वाहून जाण्यासाठी वक्राकार दरवाजे बांधण्याचा उद्देश असला तरी हा उद्देश सफल होणार नाही मात्र गोदावरी कालवे कोरडेठाक राहून लाभक्षेत्र उजाड झाल्याशिवाय राहणार नाही.
याची पूर्वकल्पना आल्यामुळे आ. आशुतोष काळेंनी दरवाजा बसविण्यास केलेला विरोध अगदी योग्य आहे. त्यांचे शासन दरबारी असलेले राजकीय वजन पाहता यामधून योग्य मार्ग निश्चितपणे ते काढू शकतात  यात दुमत नाही.याचा मला विश्वास आहे. त्यामुळे सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्यावर अन्याय होवू नये यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून आ. आशुतोष काळे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन अशोक रोहमारे यांनी केले आहे.
अशोक रोहमारे म्हणाले की, आपले हक्काचे पाणी वाचविण्यासाठी आ. आशुतोष  काळे यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करून सर्वोच्च न्यायालयात लढाई लढत आहे.त्यामुळे मराठवाड्यांच्या पुढाऱ्यांचा त्यांच्यावर अगोदरचाच रोष आहे. आता या वक्राकार दरवाजांना विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे त्यामध्ये अधिकची भर पडून नासिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा देखील रोष त्यांना पत्करावा लागत आहे. एकाच वेळी मराठवाडा व नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा त्यांच्यावररोष असतांना देखील ते आपल्या निर्णयाशी ठाम आहेत.असेही ते  बोलत होते. दहा वक्राकार दरवाजावरून नाशिक गोदाकाच्या नेत्यांचा आक्रमक पवित्रा पाहता नाशिक नगर संघर्षाची  ठिणगी पडली आहे

चौकट

जर मराठवाडा व नाशिक जिल्ह्यातील पुढारी एकत्र येवून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लढणाऱ्या आ. आशुतोष काळे यांना लक्ष करणार असतील तर आपण देखील आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे गोदावरी कालव्याचा लाभधारक शेतकरी व कोपरगाव तालुक्याचा नागरिक या नात्याने राजकीय जोडे बाजूला ठेवून आ. आशुतोष काळेंच्या पाठीशी उभे रहाणे हे आपले कर्तव्य आहे. – अशोक रोहमारे

 

Leave a Reply

You cannot copy content of this page