संतापजनक ! कोपरगाव ७ वर्षाच्या बालिकेवरवृध्दाकडून बलात्कार;
Outrageous! Kopargaon 7-year-old girl raped by elder;
आरोपी अटक तीन दिवसाची पोलीस कोठडीAccused arrested three days police custody
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 28 March 24, 20.10 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : अवघ्या सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी ५० वर्षाच्या वृध्दाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
विजय निवृत्ती बर्डे (वय ५०) रा घोयेगाव, कोपरगाव) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
बुधवारी (दि २७) मार्च २४ रोजी पीडित मुलीचे आई-वडील सकाळी १० वाजता मोलमजुरीच्या कामासाठी जात असतांना पीडित मुलीला भावजाई व आजोबा यांच्या घरी सोडून मजुरीच्या कामाला गेले असता दुपारी १२.३० ते ०१.०० वाजेच्या सुमारास पीडित मुलीस घराजवळ राहणारा इसम विजय निवृत्ती बर्डे (वय ५०)यांने १० रुपये घे असे म्हणून सदर मुलीस त्याच्या घरात बोलावून घेतले व त्याने त्याच्या घराचा आतून दरवाजा लावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला तो लैंगिक अत्याचार करत असतांना पीडित मुलीच्या मामीने सदर पिडित मुलीला आवाज दिला असता त्या नराधमाने त्या मुलीला ओरडू नको असा दम दिला.सदरची घटना मुलीने आपल्या आईला सांगितली अधिक चौकशी केली असता बलात्काराचा प्रकार पुढे आला. बुधवारी (दि २७) याप्रकरणी तालुका पोलीसात फिर्याद देण्यात आली. कोपरगाव तालुका पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांतच रात्री उशिरा अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पीडित मुलगी जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
सदर घटनेची चौकशी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरिष वमने यांच्या सूचनेनुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे अधिक तपास करत आहेत.