संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायांचा विरोध
Ambedkari followers opposed the program of Sambhaji Bhide
सर्व पावरबाज आंबेडकरी नेते एकत्र All powerful Ambedkari leaders together
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 28 March 24, 20.20 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे शनिवारी,३० मार्च रोजी कोपरगाव येथे येत असून कलश मंगल कार्यालय येथील कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत. मात्र, त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होताना पाहायला मिळत आहे.
कोपरगावमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची व्यक्त केली भीती व्यक्त करून कोपरगावला होणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये,अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे.
काही विघ्नसंतोषी लोक कोपरगाव ची शांतता भंग करून आणि मतांचे राजकारण करण्यासाठी संभाजी भिडे यांना कोपरगावात बोलवत आहेत.
आमचा कोणत्याही संघटनेला किंवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना विरोध नाही मात्र कोपरगाव येथे शनिवारी होणाऱ्या मनोहर (संभाजी) भिडे यांच्या कार्यक्रमाला आमचा विरोध असून त्याला परवानगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा आंबेडकरी अनुयायी आणि शहरवासियांनी तहसीलदार व पोलिसांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यात मालेगावच्या पाकिजा कॉर्नर चौकातदेखील भिडे यांची गाडी अडवून यांना असाच विरोध झाला होता.आता कोपरगाव दौरा चर्चेत आला आहे.
कोपरगाव शहरात कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. देशाला व राष्ट्राला संविधानाला हानीकारक असणारे वक्तव्य करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील शांतता बिघडण्याची दाट शक्यता असल्याने कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असे निवेदन तहसीलदार व पोलिसांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या गटांचे पावरबाज नेते आज खऱ्या अर्थाने सकल आंबेडकरी समाज म्हणून एकत्र दिसून आले.
यावेळी जितेंद्र रणशूर, प्रकाश दुशिंग, विजय त्रिभुवन, शरद खरात यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा कार्यक्रम झाल्यास सभा आणि संबंधित कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा कोपरगावमधील शांतता भंग पावल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जितेंद्र रणशूर, अनिल रणनवरे, शरद खरात, विजय त्रिभुवन, नितीन बनसोडे, मनोज शिंदे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र उशिरे, दिनेश कांबळे, गणेश शिंदे, संतोष शिंदे, राहुल रणशूर, शुभम शिंदे, अशोक शिंदे, नंदू कोपरे, गौतम रणशूर, संजय दुशिंग, योगेश शिंदे, देवराम पगारे, संजय कांबळे, प्रतीक पगारे, मयूर रीळ, अर्जुन मरसाळे, संदीप पगारे, यांच्या सह्या आहेत.
गुरुवारी (दि.२८) रोजी दुपारी बारा वाजता सकल आंबेडकर समाज कोपरगाव तालुका व शहर यांच्या वतीने तहसीलदार संदीप भोसले यांनी आंबेडकरी अनुयायांचे निवेदन स्वीकारले,
तर शहर पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी निवेदन स्वीकारले यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे हे होते
चौकट
आचार संहिता असल्यामुळे परवानगी देणे न देणे हा विषय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिकार कक्षेत येतो असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे तर या कार्यक्रमाबाबतची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे असे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे म्हणणे असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
Post Views:
48