कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज समाधानकारक – अपूर्व चंद्रा

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज समाधानकारक – अपूर्व चंद्रा

The functioning of Kopargaon Rural Hospital is satisfactory – Apoorva Chandra

अत्यावश्यक सेवा देताना जातीने लक्ष घाला आवाहन Appeal to pay attention to caste while providing essential services

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat30 March 24, 19.00 Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मुख्य सचिव अपूर्व चंद्रा (आयएएस) यांनी धावती भेट दिली. त्यांनी रुग्णालयाच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

 वेळचे वेळी अध्यक्ष सेवा औषध उपचार मिळावी यासाठी जातिने लक्ष घालण्याचे आव्हान त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना केले यावेळी अपूर्व चंद्रा  यांनी परिसरा रुग्णालयाच्या परिसराची व सर्व कामकाजाची सविस्तर माहिती घेत रुग्णालयातील वार्ड ऑपरेशन थेटर प्रयोगशाळा औषधालय एक्स-रे विभाग याची पाहणी केली 

यावेळेस त्यांच्यासोबत राज्य अतिरिक्त संचालक डॉ बाविस्कर, नाशिक विभागीय उपसंचालक डॉ कपिल आहेर, पुणे येथील उपसंचालक डॉ गोविंद चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे सचिन जोशी आदी उपस्थित होते

प्रारंभी वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा कुलसौंदर यांनी त्यांचे स्वागत केले ग्रामीण रुग्णालयाच्या चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली बीड येथील नुकतेच हजर झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश गुट्टे यांनी केंद्रीय मंत्रालय सचिव अपूर्व चंद्र यांचे स्वागत केले व ग्रामीण रुग्णालयाच्या वर्षभराचा आढावा सादर केला सचिव अपूर्व चंद्रा  यांनी केंद्राच्या विविध शासकीय योजना सर्वसामान्य रुग्णापर्यंत पोहोचतात का रुग्णांच्या विविध तक्रारींचे निरसन होते का असे सवाल करून येथील असे सवाल करून येथील गोल्डन कार्ड, आभा कार्ड विषयी माहिती जाणून घेतली. रुग्णालयात असलेली केस पेपर प्रक्रिया ऑनलाईन करावी म्हणून सूचना केली, तसेच येथे नव्याने मंजूर झालेले १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याबाबत सूचना केल्या. वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसुंदर यांनी वर्षभरात ग्रामीण रुग्णालयाची ६० हजार ओपीडी झाल्याचे सांगून वर्षाकाठी ४०० महिलांच्या डिलिव्हरी करण्यात आल्या, त्यात ९५ महिलांचे सिजर करण्यात आले, २९० जणांची मेजर ईसीजी काढण्यात आले, रक्त लघवी तपासणी ८२५० रुग्णांची करण्यात आली, २१०३ जणांचे एक्स-रे काढण्यात आले, अशी माहिती श्री चंद्रा यांना सादर केली. तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी ५० हजार रुपये मेंटेनन्स करता येतात त्यात वाढ करावी म्हणून मागणी केली. अपूर्व चंद्रा यांचीही धावती भेट होती. त्याआधी त्यांनी पुणे येथे तसेच शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.   

चौकट

 आय ए एस अधिकारी असलेले अपुर्व चंद्रा हे सन १९८९ मध्ये कोपरगाव च्या नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले होते असे त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवर्जून सांगितले. कोपरगाव शहराला ऐतिहासिक धार्मिक पार्श्वभूमी असून येथील जगातील एकमेव मंदिर असलेल्या गुरु शुक्राचार्याची महती सर्व दूर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.                      

Leave a Reply

You cannot copy content of this page