” ओ मुख्याधिकारी साहेब”, फलक लावा की जरा…
O Chief Officer, put up a sign that…
आधार लोकशाहीचा,आवाज जनतेचा The basis of democracy, the voice of the people
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sun31 March 24, 16.00 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : “ओ मुख्याधिकारी साहेब, फलक लावा की जरा…” अशा मथळ्याखाली रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी व इतर विकास कामांच्या ठिकाणी लोकांच्या माहितीसाठी फलक लावावे अशी मागणी थेट वर्तमानपत्रातून करण्यात आली आहे
“शहरात अतिशय जलद गतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची जनतेला माहिती कधी देणार ?” असाही सवाल आता नागरिकांच्या वतीने प्रसार माध्यमांतून थेट मुख्याधिकारी यांना जाहीररीत्या विचारला आहे. नागरीकांच्या या प्रश्नांची बाजारपेठेसह शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या दिड दोन वर्षापासून पालिकेचा कारभार प्रशासनाच्या हातात आहे या काळात मोठ्या प्रमाणावर रस्ते डांबरीकरण व विकासाची कामे सुरूच आहेत मात्र आज नगरपालिकेत , नगराध्यक्ष नगरसेवक जरी नसले तरी जनतेच्या मनातील नागरी प्रश्नांवर आवाज उठविणे हे लोकशाहीचा चौथा थांब म्हणून आमचे कर्तव्यच आहे.
शहरात सुरू असलेल्या कामांची माहिती देणारे फलक कामाच्या ठिकाणी लावण्याच्या तशा सूचना ठेकेदाराला देण्यात याव्यात,.
मात्र अजूनही “ते” फलक नपाने न लावल्यामुळे काँग्रेसने स्वतःच कामाचे नाव, योजनेचे नाव, काम पूर्ण करण्याचा कालावधी, कामाची मंजूर रक्कम, ठेकेदार संस्थेचे नाव, ठेकेदार संस्था प्रतिनिधी व अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक अशी माहिती व्यापारी व कोपरगावकरांना देण्यासंदर्भात नमूद केले असून त्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कोणतेही विकास काम केले जाते त्यावेळी त्या कामाचा तपशील नागरिकांना समजण्यासाठी अशा माहितीचे फलक लावणे अनिवार्य असते. यामुळे कामातील पारदर्शकता लोकांसमोर येत असते. मात्र जाणीवपूर्वक नपा यंत्रणा हे फलक लावत नाही. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या यंत्रणेमुळे कोपरगाव शहराची आज दैनावस्था आहे. कामांमध्ये पारदर्शकता आणण्याची गरज आहे.
सुरु असलेल्या कामांची माहिती पारदर्शकपणे कोपरकरांना मिळाली पाहिजे.
बाजारपेठेसह शहरामध्ये या महिन्यात कोटीहून अधिक रकमेचे रस्त्यांची रखडलेल्या काम सुरू असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. इतर योजनांच्या कामामुळेच बाजारपेठेतील रस्त्याची कामे लांबल्याचे कारणनगरपालिका देत आहे. शहरात सुरू असलेल्या विकास कामांची तसेच रस्त्यांच्या कामांची माहिती घेऊन टेंडर नुसार दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे झाली आहेत की नाही,? ती कामे कोणी केली ? याचे फलक का लावले नाहीत ? याबाबतची माहिती शहरातील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन यानिमित्ताने प्रसार माध्यमातून करण्यात येत आहे.तर ज्या लोकप्रतिनिधींनी शहरातील विकास कामे व रस्त्यासाठी शासनाकडून (जनतेचा पैसा )निधी आणला त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही ? याची खातरजमा करून घ्यावी, अन्यथा निवडणुकी येईपर्यंत दाखविण्यासाठी एकही विकास काम व रस्ता शिल्लक राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे. काहींचे उखळ पांढरे होईल,पण जनता मात्र विकासापासून वंचित राहील आणि मग त्या जनतेने निवडणुकीत जर जाब विचारल्यास कुणाला राग येण्याचे काम नाही, केवळनिधी आणला म्हणून दायित्व संपत नाही निधी हा जनतेचा पैसा आहे आणि लोकप्रतिनिधी हा तो निधी आणणारे सशक्त व लोकांचा विश्वास असलेले माध्यम आहे हजारो कोटीचा निधी आणून त्याचा जर व्यवस्थित विनियोग झाला नाही तर तो पैसा पाण्यात जाऊ शकतो याची संबंधितांनी दखल घ्यावी जनतेसाठी जनतेच्या वतीने नम्र आव्हान





