संजीवनीच्या ३ अभियंत्यांची दिपेश इंजिनिअरींग मध्ये नोकरीसाठी निवड
Selection of 3 Engineers from Sanjeevi for job in Dipesh Engineering
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग Training and Placement Department
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sun31 March 24, 16.10 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगांवः संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या नियोजनानुसार डीझाईन व मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रातील दिपेश इंजिनिअरींग या आघाडीच्या कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील तीन अभियंत्यांची आकर्षक पगारावर त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड केली आहे.
टी अँड पी विभागाच्या वर्षभराच्या नियोजनानुसार एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करीत असुन अशा प्रकारे या विभागाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
दिपेश इंजिनिअरींग कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये सार्थक दत्तात्रय आभाळे, मोईझ पाशु शेख व प्रसाद गजानन नर्सिकर यांचा समावेश आहे. मागील वर्षी टी अँड पी विभागाच्या प्रयत्नाने सुमारे ७७० नवोदित अभियंत्यांना वार्षिक पॅकेज रू २० लाखापर्यंच्या नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. चालु वर्षीही या विभागाची यशस्वी घौडदौड चालु असुन संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे नामांकित कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात असल्यामुळे संजीवनीचे नवोदित अभियंते कंपन्यांच्या कसोटीत उतरत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी निवड झालेल्या अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी छाटेखानी कार्यक्रमात तिघांचा सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, टी अँड पीचे डीन डॉ. विशाल तिडके, विभाग प्रमुख डॉ. प्रसाद पटारे , समन्वयक प्रा. अतुल जोशी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असुन मला तेथील एखाद्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळाला असता. परंतु संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज हे नोकरी मिळवुन देण्यात व त्या दृष्टीने तयारी करून घेण्यात आघाडीवर असते, हे मी वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्याद्वारे ऐकले होते, पाहिले होते. म्हणुन मी संजीवनी मध्येच प्रवेश घेतला. येथे पहिल्या वर्षापासूनच संभाषण कौशल्य, देहबोली, हजरजबाबीपणा, सभाधिटपणा, इत्यादी बाबींचे प्रशिक्षण तर दिल्याच जाते. परंतु, शेवटच्या वर्षात असताना टी अँड पी विभागाने कंपनीच्या गरजेनुसार आमची तयारी करून घेतली. कंपनीच्या मुलाखतीच्या अगोदर आमच्या मुलाखती घेतल्या. यामुळे दिपेश इंजिनिअरींग कंपनीच्या कसोटीत मी सहज उत्तिर्ण झालो. चार वर्षांपूर्वी ज्या विश्वासाने मी संजीवनी मध्ये दाखल झालो होतो, ते माझे स्वप्न संजीवनीने पुर्ण केले. -नवोदित अभियंता प्रसाद नर्सिकर
Post Views:
48