समर्पण देऊन प्रत्येकाने पाहावा असा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, चित्रपट – विवेक कोल्हे
Everyone should watch ‘Swatantryaveer Savarkar’ with dedication, movie – Vivek Kolhe
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed April , 21.00 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सर्वांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा, व प्रत्येक भारतीयाने पाहावा असा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’,हा चित्रपट आहे. इतरांनाही तो पाहता यावा यासाठी आपले आर्थिक समर्पणही द्यावे असे आवाहन कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोपरगाव येथे सुदेश चित्रपटगृहात मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या विशेष शो प्रसंगी केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच, सावरकर प्रेमी नागरिक यांनी स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या वतीने सुदेश चित्रपटगृहात मंगळवारी रात्री नऊ वाजेचा शो विनामूल्य आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी बलसागर भारत हो हे पद्यगायन मुकुंद कालकंद्री यांनी सादर केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन विवेक कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी विवेक कोल्हे यांनी समोर ठेवलेल्या समर्पण बॉक्समध्ये स्वखुशीने पैसे टाकण्याचे आवाहन केले. जेणेकरून या पैशातून पुढच्या काही जणांना विनामूल्य स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहता येईल स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच यांच्या माध्यमातून समर्पणातून केलेला हा आजचा प्रयोग कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले
यावेळी विवेक कोल्हे, रवीकाका बोरावके, ॲड. जयंत जोशी, शरदनाना थोरात, दिलीप घोडके,माजी सैनिक मारुती कोपरे, पराग संधान, दत्ता काले, दिलीप दारुणकर, यांचेसह शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक ,पत्रकार, महिला, सावरकर प्रेमी उपस्थित होते.
चित्रपट संपल्यानंतर सर्वांनी उभे राहून स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली अर्पण करत उदय रोकडे यांचे समवेत सामुदायिक प्रार्थना झाली. सुत्रसंचालन स्वच्छतादूत सुशांत घोडके, योग शिक्षिका वृंदा को-हाळकर यांनी केले.
कोपरगांव शहर आणि ग्रामीण भागातील विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था,सार्वजनिक मंडळे, राजकीय संघटना, सावरकर प्रेमी नागरिक यांनीही राष्ट्र समर्पणात सहभागी होवून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पोहचवावा.असे आवाहन स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर विचारमंच, सावरकर प्रेमी यांनी केले आहे.
Post Views:
55