कोपरगावात इफ्तार पार्टीचे आयोजन, दिला बंधुभावाचा संदेश
Organized Iftar party in Kopargaon, gave message of brotherhood
मौलाना यासीन मिल्ली साहब व रियाज हेडसर यांचेकडून उपक्रमाचे कौतुक Appreciation of the initiative by Maulana Yasin Milli Sahab and Riaz Hedsar
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 9April , 13.00 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : ठाकरे शिवसेनेचे भरत मोरे व गगन हाडा म्हणाले की, उपवास करणाऱ्यांना इफ्तार देणे हे अतिशय उदात्त कार्य आहे. सामूहिक इफ्तारने परस्पर प्रेम वाढते. अशा घटना हिंदू-मुस्लिम बंधुभाव आणि ऐक्याचे उदाहरण असल्याचे प्रतिपादन आयोजक ठाकरे शिवसेनेचे भरत मोरे व गगन हाडा यांनी केले.
इफ्तार पार्टीत आज हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्र येण्याची गरज आहे असे मौलाना यासीन मिल्ली साहब, यांनी सांगितले. .देशात आणि जगात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.
मौलाना यासीन मिल्ली साहब व रियाज हेडसर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
कोपरगावात रमजानचा सण जोरात सुरू आहे. त्याच क्रमाने, रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने, २७ व्या दिवशी रविवारी (६एप्रिल) रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास येथील हेडगेवार चौकात आयोजक भरत मोरे व गगन हाडा यांच्या सहकार्याने अस्लम शेख व मुन्नाभाई मन्सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली दावत -ए-इफ्तार आयोजित करण्यात आली होती. यात मोठ्या संख्येने उपवास करणारे तसेच इतर धर्माचे लोक सहभागी झाले होते.
यावेळी आयोजक भरत मोरे गगन हाडा व मार्गदर्शक असलम शेख मुन्नाभाई मन्सुरी, रियाज हेडसर, बालाजी गोरडे, संतोष ठक्कर, रहिम पहिलवान, फकिरमामु कुरेशी, मेहमूद सय्यद, ॲड शादाब शेख, डॉ पठाण, मुश्ताकभाई कॉन्ट्रॅक्टर, समीर पटवेकर, कान्हा हाडा, सोनू साबळे, सहिल पटवेकर, सलिम पठाण, राजु पठाण, सोहिल पठाण, याकुब शेख, सलिम शेख, हशमभाई पटेल,समीर शेख, नवाज कुरेशी, निसार शेख, सिक्युरिटी ईंचार्ज अकबरभाई शेख, बिल्डर याकुब शेख, अल्लाबक्ष इनामदार, आरफात शेख, पापा तांबोळी मुनिर सय्यद,राजु महाजन, सुनील भोसले, किरण लोणारी, किरण महाजन शकील भाई आत्तार, शकीलभाई खाटीक, हरूनभाई मन्सुरी आयुबभाई मन्सुरी, या मान्यवरांसह २०० ते २५० पेक्षा अधिक मुस्लिम बांधवानी २७ वा उपवास सोडला अचानक गर्दी झाल्यानंतर मांडवाच्या बाहेर लोकांना खुर्च्या टाकण्यात आल्या अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
Post Views:
72