नांदूरमधमेश्वरवर १० वक्राकार दरवाजे;  राधाकृष्ण विखेंनीच आता ‘यात’ लक्ष घालावे- आ. आशुतोष काळे

नांदूरमधमेश्वरवर १० वक्राकार दरवाजे;  राधाकृष्ण विखेंनीच आता ‘यात’ लक्ष घालावे- आ. आशुतोष काळे

10 curved doors at Nandur madhmeshwar; Radhakrishna Vikhe should pay attention to this now. Ashutosh Kale

पिण्यासाठी पश्चिम भागाला निळवंडेचे पाणी दिले त्याच पद्धतीने पूर्व भागाला पालखेडचे पाणी द्या,Give water from Palkhed to the east in the same manner as the water of Nilvanda was given to the western part for drinking.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 9April , 13.10 Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : पिण्यासाठी पश्चिम भागाला निळवंडे चे पाणी दिल,  त्याच पद्धतीने पूर्व भागाला पालखेडचे पाणी द्यावे,नांदूर मधमेश्वर धरणाला १० वक्राकार दरवाजे बसविल्यास गोदावरी कालव्यावरील शेतकऱ्यांना ओव्हरफ्लोच्या पाण्यापासुन  मुकावे लागणार आहे याबाबत मी घेतलेल्या जाहीर भूमिकेस तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे यांनी आता ‘यात’ लक्ष घालावे, अशी मागणी  आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे 

गोदावरी कालव्यांचे  पाणी कमी झाल्यामुळे लाभक्षेत्र उजाड होत आहे. अशा परिस्थितीत गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर एकामागून एक संकटे चालून येत असून हे संकटे थांबण्याचे नाव घेत नाही एका संकटाशी संघर्ष सुरु असतांनाच दुसरे संकट उभे राहत आहे. आधीच समन्यायी पाणी वाटपामुळे नगर नाशिकचा शेतकरी उध्वस्त झाले आहे सातत्याने होणारे अवकाळी दुष्काळ यामुळे वारंवार तो संकटात सापडत आहे. गोदावरी कालव्यांचे  पाणी कमी झाल्यामुळे  परिणाम मिळणाऱ्या आवर्तनावर होत असल्यामुळे लाभक्षेत्रावर मोठा अन्याय झाला आहे. होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रत्येक अधिवेशनात आवाज उठविला आहे मात्र सरकार कोणतेही असो सातत्याने नगर-नाशिकच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी नियमित बैठका घेवून हा अन्याय दूर करावा.अशा परिस्थितीत गोदाकाठच्या गावांनी पूर  संकटाचे  कारण देत  नांदूर मधमेश्वर धरणावर  दहा वक्राकार दरवाजे  बसविण्याचा घाट घातला आहे याचा परिणाम कालव्याच्या लाभक्षेत्राला ओव्हर फ्लोच्या पाण्यापासून वंचित ठेवू पाहत आहे या विरोधात आपण  न्यायालयीन लढाईची  मी जाहीर भूमिका घेतली आहे आपण देखील यामध्ये लक्ष घालावे.असे साकडे घातले. 
मागील वर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे कोपरगाव मतदार संघात दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून पूर्व भागातील व वरच्या भागातील बहुतांशी गावात नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पिण्यासाठी निळवंडे व पालखेड कालव्याचे पाणी द्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
निळवंडे डाव्या कालव्याला अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी मिळाले. त्यामुळे वरच्या भागातील काकडी,मल्हारवाडी,  डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांना फायदा होवून भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होवून आजपर्यंत पाणी पुरले. याची याची आठवण आठवण आमदार काळे यांनी नामदार विखे यांना करून दिली
पूर्व भागातील गावांची देखील झालेली आहे. या भागातील नाटेगांव, आंचलगांव, ओगदी, पढेगांव, कासली, दहेगांव बोलका,शिरसगांव- सावळगांव, तिळवणी, आपेगांव, उक्कडगांव, तळेगांव मळे या भागात भू-गर्भाची पाणी पातळी खालावली जावून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या गावात देखील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. सध्या  पालखेड कालव्याचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरु असून या आवर्तनातून या गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना कराव्यात असेही काळे यांनी नामदार विखे यांना सुचविले

चौकट

 नांदूर मधमेश्वर धरणावर वरील १० वक्रकार दरवाजाबाबत लेखी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादा भुसे, जिल्हाधिकारी अहमदनगर व नाशिक,पाटबंधारे विभाग नाशिक व छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे देखील केली आहे.- आ आशुतोष काळे 

Leave a Reply

You cannot copy content of this page