कोपरगावात चारुदत्त महाराज आफळे यांच्या ओजस्वी वाणीतुन श्री विष्णू महापुराण कथा

कोपरगावात चारुदत्त महाराज आफळे यांच्या ओजस्वी वाणीतुन श्री विष्णू महापुराण कथा

Sri Vishnu Mahapuran story from Charudatta Maharaj Afale’s powerful voice in Kopargaon

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 9April , 13.20 Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेश गिरी महाराज यांच्या कृपा आदेशानुसार राष्ट्रीय कीर्तनकार पुणे येथील चारुदत्त महाराज आफळे यांच्या ओजस्वी वाणीतून दक्षिण वाहिनी गोदावरीच्या पवित्र तीरावर श्री विष्णू महापुराण कथा हा ज्ञान कथा सोहळा गुढीपाडवा मंगळवार दिनांक ९ ते १६ एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे . शहरात सुसंस्कार व धार्मिक विचाराची भक्तीमय परंपरा वाढीस लागावी याकरता विविध प्रकारच्या कथा प्रवचन अथवा कीर्तन यासारख्या भक्ती महापर्वाचे आयोजन करण्याचे भाग्य श्री साई गाव पालखी सोहळा व समस्त कोपरगावकरांना मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने करण्यात येते.      

  तहसील कार्यालयाच्या शेजारी मैदानात अलंकापुरी  नगरी येथे श्री विष्णू महापुराण कथा दररोज सायंकाळी सात ते दहा या वेळेत होणार आहे. तसेच मंगळवार गुढीपाडवा निमित्त शारदा संगीत विद्यालय जेष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तीगीत व लोकसंगीताचा पहाट पाडवा सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत होणार आहे. मुली व महिला यांची मोटार सायकल रॅली अभिवादन यात्रा सकाळी सात वाजता सुरू होईल. आनंद ऋषीजी हॉस्पिटल व ज्येष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या सहकार्याने शुक्रवार दिनांक १२ रोजी मोफत नेत्र शिबिराचे अजमेर हॉस्पिटल श्रीराम मंदिर रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. 

  न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्याते वसंत हंकारे यांचे शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा यावेळी कलश मंगल कार्यालय येथे व्याख्यान होणार आहे.                     
शैलबी हॉस्पिटल अहमदाबाद व ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या सहकार्याने रविवार दिनांक १४ रोजी सकाळी दहा ते बारा या काळात मोफत गुडघे व हाड तपासणी शिबिर याचे आयोजन अजमेरे हॉस्पिटल येथे केले आहे. अखंड साई चरित्र पारायण मंगळवार दिनांक १६ रोजी साई पालखी प्रस्थान राम नवमी बुधवार दिनांक १७ रोजी दुपारी चार वाजता तसेच ह भ प रेखा गायकवाड यांचे काल्याचे किर्तन महाप्रसाद व भंडारा दिनांक १८ गुरुवार रोजी सकाळी नऊ ते एक वाजे दरम्यान केला जाणार आहे. भावीक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे आवाहन आयोजक मुंबादेवी तरुण मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page