कोपरगावात सर्वधार्मिय विवाहात घुमले सनईचे सूर, १८ जोडप्यांसाठी सगळेच आले,
In Kopargaon, all-faith weddings played the tunes of clarinet, everyone came for the 18 couples.
चार वर्षात १०८ जोडप्यांचे शुभमंगलGood luck to 108 couples in four years
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 24April , 20.30 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : या सधन तालुक्यात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शाही थाटात संपन्न झाला. विविध धर्मीय १८ जोडप्यांच्या विवाहासाठी सगळेच आले, संपूर्ण गाव एकवटला.
आपला विवाह धूमधडाक्यात व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.परंतु,परिस्थितीमुळे अनेकांना विवाहाचा खर्च परवडत नाही. अशावेळी सामूहिक विवाह सोहळा चांगला पर्याय ठरतो.कोपरगाव हा सधन तालुका असला तरीही या भागातील सर्वसामान्यांना लग्न सोहळ्याचा आणाठाई खर्च झेपत नाही.ही गोष्ट युवा नेते विवेक कोल्हे यांनी हेरली.
गावासह परिसरातील तरुण-तरुणींचे विवाह धूमधडाक्यात व्हावेत म्हणूनसंस्थापक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.
गोरज मुहूर्तावर १८ जोडपे विवाह बंधनात अडकली. या जोडप्यांचे संत महंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आप्तेष्ट आणि कोपरगावकर यांच्या साक्षीने हा शाही लग्न सोहळा संपन्न झाला.
संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा चौथा सामूहिक विवाह सोहळा होता. हजारो कोपरगावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटासह तीन सुवर्ण रथातून मारूतीरायाचे दर्शन घेऊन नवरदेव घोडे, डीजे, फटाक्यांची आतिषबाजी वाजत गाजत विवाहस्थळी पोहचले,
तहसीलदार कचेरी नजीकच्या अलंकापुरी नगरीच्या भव्य प्रांगणात सोमवारी (दि २२) रोजी सायंकाळी भव्य दिव्य शाही स्वरूपात हा सोहळा संपन्न झाला. या वेळी सर्व धर्मियांचे पौरोहित्य करणाऱ्या गुरूंना या सोहळ्यात आमंत्रित करून त्यांच्याकडून शास्रोक्त पद्धतीने वैवाहिक लग्न गाठ बांधण्यात आली. वधू-वरांचाही त्यांच्या धर्म पद्धतीने विवाह लावण्यात आला.सर्वधर्मीय मिलाप येथे पाहायला मिळाला
सर्व वधू-वरांना रेशीमगाठी बांधताना शुभाशीर्वाद देण्यासाठी महंत काशिकानंद महाराज, महंत कैलासगिरीनंद महाराज, महानुभाव पंथाचे अनंत महाराज, भन्तेजी मदन कश्यप, महंत विकासगिरी महाराज, महंत राघवेन्द्रनंद महाराज, मेथडीष्ट चर्चचे फादर भोसले, ह.भ.प.चांदगुडे महाराज, ह.भ.प. मोरे महाराज, मौलाना हाफिज बशीर, मौलाना आसिफ, मौलाना नसीर, हाजी रियाज सर, खा. सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, मा.आ.सौ. स्नेहलता कोल्हे, दत्तू नाना कोल्हे, संजीवनी एज्युकेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, प्रणव पवार,संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विवेक कोल्हे, इशान कोल्हे, सौ. मनाली कोल्हे, सौ. रेणूका कोल्हे, सौ.श्रद्धा कोल्हे यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते,युवा सेवक व वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वधूवरांचे पोशाख, मंगळसूत्र,आहेर, रुखवत व इतर विधिकार्याची स्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था पाहावयास मिळाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे यंदाचे ४थे वर्ष होते. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व जावईबापूंना मानाचे आहेर करण्यात आले. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात सर्व नव विवाहित जोडप्यांचे कन्यादान रितिरिवाजाप्रमाणे कोल्हे परिवाराने केले. वऱ्हाडी मंडळी स्वादिष्ट अशा पंचपक्वांनाची व्यवस्था करण्यात आली होती.सर्व वधु-वरांची ढोल ताशाच्या गजरात सामूहिक वरात काढण्यात आली.शाही आनंदाचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.