आता हे दोनच झटके; अजून धक्के पचवावे लागतील – सुधाकर रोहोम
Now these two strikes; More shocks have to be digested – Sudhakar Rohom
कोल्हे यांच्या टीकेवर काळेकडून पलटवारkale counterattacks on Kolhe’s criticism
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wef 10April , 20.30 Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुका नसतांना दोन जबर झटके बसले आहे. मात्र या दोनच झटक्यात आत्ताच संतुलन बिघडवू देवून नका असा उपरोधिक सल्ला कर्मवीर काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हे यांचे नाव न घेता दिला आहे.
चाळीस वर्षात केंद्रात व राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार सर्व प्रकारची सत्ता असतांना ४० वर्षात त्यांना जे जमल नाही ते आ.आशुतोष काळे यांनी मागील साडे चार वर्षात निधी आणून विकासातून केले. जनता या विकास कामांवर खुश देखील आहे.
जनता त्याच नेत्याला बोलाविते जो नेता जनतेच्या सुख दु:खात नेहमी सहभागी असतो. तुम्हाला चाळीस वर्ष सत्ता देवून देखील तुम्हाला रोजगार निर्मिती करता आली नाही त्यामुळे कित्येक नागरिक व्यवसायाकडे वळले, ते तुम्हाला देखवत नाही.त्यांना शुभेच्छा दिलेल्या तुम्हाला आवडत नाही.याचे माझ्यासह सर्व उद्योग व्यावसायिकांना नक्कीच दु:ख वाटले परंतु तुम्ही किती कोत्या मनाचे आहात असा टोलाही त्यांनी लगावला.
दुखत कुठे आणि सांगता कुठे तुमच्या या भावना जनतेच्या लक्षात आल्या आहेत आणि आम्ही देखील समजून घेतल्या आहेत. मात्र एका जागेवर बसून गप्पा हाणू नका. गेस्टहाऊस मध्ये एका जागी बसून विकास होत नसतो.अशा शब्दात आ. आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या कोल्हेंच्या टिकेचा खरपूस समाचार रोहोम यांनी घेतला.
गेस्टहाऊस मध्ये बसणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनी तीनशे कोटी व तीन हजार कोटीचा फरक अगोदर समजून घ्यावा चाळीस वर्ष एकत्र केले तर तीन हजार कोटी होत नाही याचे देखील तुम्हाला दुख आहे. मात्र या दु:खापोटी आमदारांच्या वडिलांवर टीका करणे कितपत योग्य आहे?आ.आशुतोष काळे यांच्या वडिलांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील दोन पंचवार्षिक केलेला विकास तुम्ही पहिला आहे जनतेने देखील पहिला आहे परंतु एकीकडे खडा टाकायची व जल समाधी घ्यायची भाषा करायची व पाणी सोडण्यासाठी स्वत:च गेट उघडायला पुढे जायचे यावर आ.आशुतोष काळे वेळ आल्यावर बोलतील समन्यायी चे पाप कोणाचे यावरही ते मिळाल्यावर सविस्तर बोलतीलच असे रोहम यांनी सांगितले आहे. तोपर्यंत अजून धक्के सोसण्याची मानसिकता करून घ्या व यापुढील काळात जरी जून काही धक्के बसले तरी आपला संयम मात्र ढळू देवू नका अजून धक्के तुम्हाला पचवावेच लागतील असा सल्ला शेवटी दिला आहे.
रोहोम यांच्या या टिकेमुळे कोल्हे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
Post Views:
49