दर्जेदार शैक्षणिक संस्थांची परंपरा  कोल्हे परिवाराने पुढे चालू ठेवली – स्नेहलता कोल्हे

दर्जेदार शैक्षणिक संस्थांची परंपरा  कोल्हे परिवाराने पुढे चालू ठेवली – स्नेहलता कोल्हे

The Kolhe family continues the tradition of quality educational institutions – Snehalata Kolhe

संजीवनी शैक्षणिक संकुलातून अनेक मुली  शिकल्या! Many girls studied from Sanjeevani Educational Complex

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 10 May , 19.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : ग्रामीण भागातील मुल मुली शिकून  स्वावलंबी व्हावित, अशी  तळमळ असायची आणि आपल्या सर्वच संस्था दर्जेदार असाव्यात, असा ध्यास स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा असायचा. तिच परंपरा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिन कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष  बिपीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी पुढे चालु ठेवली असल्याचे गौरव उद्गार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी  इंजिनिअरिंग कॉलेजच्या सन २०२३-२०२४ च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले. 

सौ. कोल्हे पुढे म्हणाल्या की, स्व. शंकरराव  कोल्हे यांनी येथे विविध शैक्षणिक  दालने खुली केल्यामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांची  मुल मुली शिकू शकली . त्यातील काही मोठे उद्योगपती झाले तर काही देश परदेशात मोठ्या  पदांवर कार्यरत आहेत.
 पुर्वी मुलींना शिकण्यासाठी बंधने असायची. परंतु संजीवनी शैक्षणिक  संकुलाच्या माध्यमातुन अनेक मुली शिकल्या  आणि आज त्या कर्तबगार महिला म्हणुन बावरत आहेत, ही खुप मोठी उपलब्धी आहे. भविष्यात  समाज व देश  हिताचे कार्य करा. आपल्यासाठी जगताना समाजासाठीही जगा. मोबाईल गरजेचा आहे, परंतु त्याच्या किती आहारी जायचे याचे भान ठेवा. ध्येयापासुन वंचित होवु नका. चुकीच्या मैत्री पासुन सावध रहा. रडायला नाही तर लढायला शिका , असा मौलिक त्यांनी दिला. 
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, प्रत्येक स्पर्धेतुन विद्यार्थी घडत असतात. पहिल्या स्पर्धेतील अपयश  हे पुढच्या स्पर्धेतील विजयाची नांदी असते. मात्र जय पराजयापेक्षा स्पर्धेत भाग घेणे महत्वाचे असते. यातुनच व्यक्ती भविष्यातील  बहुकार्य भुमिका (मल्टी टास्कींग रोल) साकारण्यास सक्षम होतो, व उत्तम करीअर घडते,  प्रगती करीत असताना संकटे येतात, परंतु संकटांना आव्हाने समजुन त्यावर मात करावी. जे लोक यशस्वी झाले त्यांना सर्वच परीस्थिती अनुकुल नव्हती. मात्र जिध्द, चिकाटी आणि प्रचंड महत्वकांक्षा असली तर जीवन यशस्वी होते. असे ही त्यांनी स्पष्ट केले. 
 व्यासपीठावर इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, स्टुडन्टस् कौन्सिलचे डीन डॉ.मकरंद कुलकर्णी  उपस्थित होते. 
गुणवंत विद्यार्थी मोठ्या  संख्येने उपस्थित होते तर काही पालकही उपस्थित होते.
         
 प्रारंभी डॉ. ठाकुर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनीच्या सर्वच संस्था कशा  प्रगतीकडे जात आहे, याची थोडक्यात माहिती दिली.   डॉ. मकरंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page