सदाशिव लोखंडें यांच्या धनुष्यबाणाला  मतदान करुन मोदींच्या विकासाच्या इंजिनाला ताकद द्या – देवेंद्र फडणवीस 

सदाशिव लोखंडें यांच्या धनुष्यबाणाला  मतदान करुन मोदींच्या विकासाच्या इंजिनाला ताकद द्या – देवेंद्र फडणवीस 

Give power to Modi’s development engine by voting for Sadashiv Lokhanden’s bow and arrow – Devendra Fadnavis

‘मोदी है तो मुमकिन है’पश्चिमेचे पाणी पूर्वला Modi hai to mumkin hai’ is the water of the west

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 9 May , 19.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : विरोधक केवळ शिवीगाळ शिवाय काही बोलत नाही, विकासाबाबत बोलत नाहीत. मोदी यांनी मात्र विकासाचं काम केलं.अनेक विकास योजना आणल्या. मोदी म्हणतात, महिला पायावर उभी राहते तेंव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो, सदाशिव लोखंडे यांना मतदान केले तर मोदी यांच्या इंजिनाला ताकद मिळेल आणि देशाचा विकास होईल. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कडाक्याच्या उन्हात तुम्ही समर्थन देण्यासाठी आले आहात, काळे कोल्हे एकत्र आले तर समोरच्याला काय उरेल ? महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंना कोपरगाव मतदार संघातून सर्वात जास्त मताधिक्य द्यायचे, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. 

इंडिया आघाडीत प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतोय

विरोधक ही निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक असल्यासारखे वागत आहेत. हा देश कोणाच्या हातात द्यायचा, त्याची ही निवडणूक आहे. संजय राऊत यांचे नाव न घेता सकाळी नऊ वाजताच एक जण टीव्हीवर येतो  आणि म्हणतो आम्ही पाच वर्षात पाच पंतप्रधान करू!  पण पहिला कसा ?  हे मात्र सांगत नाही संगीत खुर्चीप्रमाणे जो पहिला बसेल तो यांचा पंतप्रधान ही यांची मानसिकता देश म्हणजे काय प्रायव्हेट कंपनी, उद्योग आहे का ? असा सवाल करताना ज्यांच्याकडे नेता नीती  आणि नियती नाही कोणी कोणाला नेता म्हणायला तयार नाही अशी ही राहुल गांधी नेतृत्व करीत असलेल्या इंडिया आघाडी २४ पक्षांची खिचडी आहे. अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आपल्या महायुतीच्या गाडीचं मोदीजी हे पावरफुल इंजिन आहेत. आपल्या इंजिनाला सर्वपक्षाच्या बोग्या लागल्या आहेत, ज्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत. इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजत आहेत.  इंडिया आघाडीत बोग्याचं नाहीत प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतोय. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, शरद पवार , उद्धव ठाकरे स्टॅलिन, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव म्हणतात मी इंजिन, यात आदित्य ठाकरे यांना जागा तिथे इंजिनच आहेत. बोगीच नाहीत. इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते, इंजिनमधे केवळ चालक बसतो. राहुल गांधी यांच्याकडे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासाठी जागा आहे शरद पवार यांच्याकडे सुप्रिया सुळे यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा आहे. यांच्या इंजिनमध्ये फक्त यांच्या परिवारासाठी जागा आहे, सामान्य माणसासाठी नाही. यांच्यासाठी यांचा परिवार दुनिया आहे पण, मोदींजीसाठी संपूर्ण देश त्यांच्या परिवार आहे दीन दलित गरीब शेतकरी आदिवासी यांना या सगळ्यांना विकासाच्या बोगीत बसण्याची जागा आहे. आणि त्या परिवारासाठी ते काम करतात. , असं म्हणत फडणवीसांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.
ज्या भाऊसाहेब वाकचौरेला तुम्ही गद्दार तूपचोर म्हणाले, त्याला तुम्ही शिव्या दिल्या त्यालाच तिकीट दिले  आज त्याचा प्रचार करीत आहात  असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले  ज्या दिवशी काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ येईल. त्यावेळेस शिवसेना बंद करील असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते  आज तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले त्यांच्यासाठी मत मागतात अशी खिल्ली उडविताना  देशाची निवडणूक आहे.  जगातले लोक याची चर्चा करत आहेत. असा टोलाही लगावला . 

उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांची कोल्हेच्या निवासस्थानी सदिच्छा भेट -दत्तू नाना कोल्हे, आ. सौ. स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, नितीन कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, इशान कोल्हे,सौ. रेणूका कोल्हे व श्रद्धा कोल्हे आदीसह कोल्हे परिवार उपस्थित होते.

 नरेंद्र मोदींनी दहा वर्षात देश बदलला

ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात विकासाची गती बदलली आहे. दहा वर्षात देश बदलला आहे. २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वरती आणले, दहा कोटी गरिबांना पक्की घर दिले, ५५ कोटी लोकांना शौचालय दिले, महिलांचा डोक्यावरील हंडा उतरून ६० कोटी लोकांना नळाला पाणी दिले, ८० कोटी लोकांना दोन वेळचे मोफत अन्न दिले, यात महाराष्ट्रातील सात कोटी लोकांना मोफत रेशन दिले, एक महिला उभी राहिली तर कुटुंब उभे राहते विचार करून ८० लाख बचत गट महिलांना सक्षम केले दहा कोटी महिलांना लखपती करणार ६० कोटी लोकांना मोदीच्या गॅरंटीवर दहा ते पंधरा लाखापर्यंत मुद्रा लोन दिले असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सबका साथ सबका विकास म्हणत महायुतीची ट्रेन पुढे जात असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी तरुणांना कर्ज उपलब्ध करून दिले. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मोफत उपचार उपलब्ध करून दिले, विश्वकर्मा योजनेअंतर्गत बारा बलुतेदारांना निधी दिला. सिंचनासाठी ५० हजार कोटी खर्चून प्रकल्प सुरू केले रस्ते, पूल, रेल्वे, वीज अशी प्रचंड कामे केली. समृद्धी महामार्ग केला असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. २०२३ ला निळवंडेचे पाणी पोहोचले आता चाऱ्यासुद्धा करू  सरकार थांबणार नाही
असे आश्वासन देताना स्नेहलता कोल्हे यांना सुद्धा निधी दिला होता काळे यांना सुद्धा मोठ्या निधी दिला असल्याचा खुलासा केला. स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागात संजीवनी शैक्षणिक संकुल उभारले वर्षात  सुमारे बाराशे विद्यार्थ्यांना २७ लाखाचेवार्षिक पॅकेजवर नोकरी मिळवून दिल्या आहेत. ही फार मोठी उपलब्ध आहे.
कोपरगाव पंचायत समिती येथील कर्मवीर  शंकरराव काळे स्मारकाला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशुतोष काळे,माजी आमदार  स्नेहलता कोल्हे

इन्कम टॅक्स माफी करून इथेनॉल उत्पन्नाला प्रोत्साहन देवून  सहकारी साखर कारखानदारी जगवली

सहकारी साखर कारखाने कारखानदारी बाबत यापूर्वी कोणालाही घेता न आलेला   वर्षानुवर्षाच्या भिजत पडलेला इन्कम टॅक्स प्रश्न मार्गी लावण्यासाठी व शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी मोदी सरकारने कायदा बदलून मागचा पुढचा सर्व दहा हजार कोटीचा इन्कम टॅक्स रद्द केला इथेनॉल पॉलिसीच्या माध्यमातून  साखर कारखानदारी जगवली सहकारी साखर कारखानदारी मजबूत केली आहे. 

मोदीच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत झाला

आज भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिम्मत नाही वाकडी नजर करून पाहिलं पहाल तर घुसून मारतो पाकिस्तानला माहिती आपला बाप दिल्लीत बसला आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षात एकही दंगल घडलेली नाही बॉम्बस्फोट झाले नाही. 
सुरक्षित विकसित अशा आकांक्षा अपेक्षा यांचा फैसला करणारी ही निवडणूक आहे  विश्व गौरव विश्वपुरुष नरेंद्र मोदी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार  मनसे रिपाई रासप जनसंघ अशी मजबूत महायुती  आहे.  ५४२ खासदारांमध्ये  एक वेगळाच आणि मोठा मान असतो  सन्मान मिळतो  वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघितले जाते म्हणूनच आज  संपूर्ण भारताचे लक्ष  शिर्डीच्या  निवडणुकीकडे लागले आहे  शिर्डीचा खासदार  म्हणून लोखंडे यांना मोठा मान असतो या निमित्त त्यांनी लोखंडे  यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन देखील केले.एकमेकांत मतभेद असू शकतात परंतु आता देशासाठी मतभेद दूर केले पाहिजे काळे कोल्हे एकत्र आले ते समोरच्याला काही मिळेल असे मला वाटत नाही.

विधानपरिषद  सभापती नीलमताई गो-हे  म्हणाल्या की,   विरोधकांकडून संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केला जात आहे. लोकसभा निवडणूक ही राज्य  सरकारची परीक्षा आहे  ज्या उमेदवाराने साई संस्थांच्या  तुपावर डल्ला मारला, जो साईबाबांशी प्रामाणिक नाही, तो जनतेशी कसा प्रामाणिक राहील असा सवाल  उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव न  त्यांनी मतदारांना केला 

आ. आशुतोष काळे म्हणाले की, ही देशाची निवडणूक आहे स्थानिक मुद्द्यापेक्षा देशाचा विचार या ठिकाणी करण्याची गरज आहे मोदींना  पंतप्रधान करण्यासाठी  सदाशिव लोखंडेंना संसदेत पाठवावे लागणार आहे.केंद्रात मोदी सरकार राज्यात शिंदे, फडणवीस व  पवार यांचे महायुतीचे सरकार असे एकच सरकार असल्यास प्रश्न सुटतील आणि निधी मिळेल. कोपरगाव विधानसभेतून मताधिक्य मिळवून देऊ मोदी यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी  देवेंद्र फडणवीस यांना दिले.  

सदाशिव लोखंडे म्हणाले, मी दोन वेळा आमदार, दोन वेळा खासदार राहिलो आहे. मी कामे केली परंतु वाजवले  (गाजावाजा) केला नाही. निळवंडे चा ४५ वर्षापासून रखडलेला प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.सोडविला १८२ गावाला पाणी पोहोचवले,  जायकवाडीला पाणी सोडा परंतु २५ टीएमसी पाणी नगर, नाशिकसाठी राखीव ठेवावे,  घटमाथ्याचे पाणी आणा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.आज काळे कोल्हे एकत्र आलेले आहेत, मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी येथील मतदार मला जास्त मतांनी निवडून देतीलअशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,  आज लोकशाहीचा देशभर उत्सव सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सदाशिव लोखंडे यांचीही  विजयाची हॅटट्रिक  होणार आहे.  देशाच्या भवितव्याची ही निवडणूक आहे.माजीमंत्री स्व.  शंकरराव कोल्हे यांचे सांगणे असायचे की, देश व समाजासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून, कुठे लढायचे, कुठे थांबायचे  हे आम्हाला शिकवले आहे. देशात आणि राज्यात एकच सरकार हवे आहे. जगभरात लोकप्रिय असलेले सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हवे आहेत. ज्यांनी दोन देशातील युद्ध थांबून भारतीयांना परत आणले, महिलांना सन्मानाची  वागणूक दिली, त्यांच्यासाठी गावठी भावकी बाजूला ठेवून  मनापासून  आपल्याला सदाशिव लोखंडे यांना मताधिक्याने निवडून आणायचे आहे  असे आवाहन त्यांनी समोर बसलेल्या मतदारांना केले

या महाविजय संकल्प सभेस केंद्रीय मंत्री भागवत कराड, विधानपरिषद  सभापती निलमताई गो-हे,  राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे, आ. संजय शिरसाट, आ. आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे,  संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे,  माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, संभाजी दहातोंडे, राजेंद्र पिपाडा, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, बीएसएनएल समितीचे रवीकाका बोरावके, कोल्हे कारखाना उपाध्यक्ष  मनीष गाढे,  काळे कारखाना उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशव भवर, दिलीप दारुणकर, राजेंद्र सोनवणे, अरुण येवले, शरद नाना थोरात, रवींद्र पाठक, दत्ता काले, बबलू वाणी, विनोद राक्षे, रिपाईचे कार्याध्यक्ष दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड, मनसेचे सतीश काकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव, मंदार पहाडे, वीरेन बोरावके, धरमशेठ बागरेचा,शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनिल नरोडे, शहर प्रमुख अक्षय जाधव, सनी गायकवाड, युवा सेना शहरप्रमुख मनोज राठोड, नंदन घाडगे, उपशहरप्रमुख कृष्णा पवार, शहर संघटक विनोद गलांडे,तालुका प्रमुख मीनाक्षी वाघचौरे,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, तालुका प्रमुख रावसाहेब थोरात,संजय गुरसळ, या मान्यवरासह आदीसह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विक्रम पाचोरे यांनी केले तर आभार धनंजय जाधव यांनी मांडले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन केशव भवर,  बाजार समिती सभापती साहेबराव रोहोम,  पंचायत समिती माजी सभापती शिवाजी वक्ते, सुनील देवकर, शिवसेना महिलाआघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

चौकट

 नगर नाशिक मराठवाडा यांच्यातील संघर्ष  संपवण्यासाठी शाश्वत सिंचन योजना करून पश्चिमेचे पाणी पूर्वला वळविण्यासाठी जल आयोगाची मान्यता घेतली आहे. ४० ते ५० हजार कोटीचा आराखडा पाठविला आहे ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हणत नगर नाशिक मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटेल, – संघर्ष संपेल देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र

Leave a Reply

You cannot copy content of this page