इफको संचालकपदी विवेक कोल्हे यांची निवड; राष्ट्रीय स्तरावर कोपरगावतालुक्याला प्रतिनिधित्व

इफको संचालकपदी विवेक कोल्हे यांची निवड; राष्ट्रीय स्तरावर कोपरगावतालुक्याला प्रतिनिधित्व

Election of Vivek Kolhe as IFFCO Director; Representation of Koparga Talukya at national level

महाराष्ट्र, तेलंगणा आणि गोवा या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारThe states of Maharashtra, Telangana and Goa will be represented

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 10 May , 19.10 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव :  सहकारमहर्षी   शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष, संजीवनी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष  विवेक कोल्हे यांची इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को ऑपरेटिव्ह (इफको) नवी दिल्लीच्या संचालकपदी   निवड करण्यात आली आहे.

सहकारमहर्षी   शंकरराव कोल्हे साखर कारखाना, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे , संजीवनी प्रतिष्ठान, शेतकरी सेवा संघाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांच्या संपर्कात असलेल्या विवेक कोल्हे यांनी यापूर्वी इफकोचे  आर जी बी म्हणून त्यांनी संस्थेचा कामकाज अनुभव घेतला आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळांत महाराष्ट्र, तेलंगणा आणि गोवा राज्याचे प्रतिनिधित्व कोल्हे करणार असल्याने त्यांची राष्ट्रीय स्तरावर संचालक पद मिळाले असल्याने, कोपरगाव तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
इफको जगभरातील ४९ देशांमध्ये ९५ ऑपरेशन्स चालवते. १२ हजारहून अधिक लोकांना रोजगार देते. त्याची उत्पादने पाच खंडापर्यंत पोहोचलेले आहेत. एकूण ८० पेक्षा अधिक ब्रँडमध्ये त्यांची भागीदारी व गुंतवणूक आहे. इफकोची वार्षिक उलाढाल सुमारे ४० हजार  कोटी रुपये असून सुमारे ३६ हजार सभासद शेतकऱ्यांशी इफको चा दैनंदिन संपर्क असून भारत देशासह जगभरातील सुमारे साडेपाच कोटी शेतकऱ्यांपर्यंत इफकोची उत्पादने पोहोचलेली आहेत. इफकोच्या अन्य १४ संलग्न कंपन्या आहेत.जगाच्या मध्य व पूर्वेतील मुख्य आणि सर्वात वैविध्यपूर्ण समूह म्हणून इफकोचे नावलौकीक आहे.
इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही एक सहकारी संस्था असून, भारत सरकारने १९६७ साली याची स्थापना केली होती. भारतीय शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत उच्च दर्जाची खते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
इफको नविदिल्ली या संस्थेची संचालकपदाची निवडणुक पार पडली त्यात राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक, जिल्हा बँकेचे संचालक . विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र गोवा आणि तेलंगणा राज्य मिळून संचालक पदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांची संचालक म्हणून निवड झाल्याची घोषणा नवी दिल्ली येथे करण्यांत आली आहे.
स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडुन सहकारी साखर कारखानदारीचे धडे घेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली उस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रश्न समजावून घेत  कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा तरूणवयात हाती घेत खुल्या आर्थीक व्यवस्थेत सहकारासमोर निर्माण झालेल्या आव्हानांचा अभ्यास करत साखर व त्यावर आधारीत विविध रासायनिक उपपदार्थ, औषधी उत्पादने, सहवीज, बायोगॅसवर आधारीत वीज निर्मीती, संजीवनी बायो कंपोस्ट खत, पोटॅश, सीएनजी आदी प्रकल्प यशस्वीपणे राबवून शेतक-यांचे प्रती एकरी उस उत्पादन वाढीसाठी धडक कार्यकम हाती घेतला.,सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट कोईमतुर तामिळनाडु या संस्थेचे उपाध्यक्ष, को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक म्हणूनही त्यांना कामाची संधी मिळाली आहे. ते उच्चशिक्षीत बी. ई. स्थापत्य अभियंते आहेत.त्यांनी सहकार क्षेत्रात कमी वयात चांगला अभ्यास केला आहे. इफकोचे यापूर्वी आर जी बी म्हणून त्यांनी संस्थेचा कामकाज अनुभव घेतला आहे,संचालक म्हणून आगामी काळात त्यांना या अनुभवाचा फायदा शेतकरी हितासाठी कामकाज करताना होणार आहे.  शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 

Leave a Reply

You cannot copy content of this page