दुहेरीकरणाच्या कामामुळे मनमाड दौंड मार्गावरील अनेक गाड्या रद्द, तर काही वळवल्या!
Many trains on the Manmad Daund route were canceled and some were diverted due to the doubling work!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu27June , 16.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : मनमाड दौंड गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यामागील मुख्य कारण म्हणजे मनमाड दौंड मार्गावरील दुहेरीकरण व प्री नॉनइंटरलॉकींग कामासाठी २८ जूनपर्यंत दहा दिवसांचा मोठा रेल्वेब्लॉक घेण्यांत आला असुन अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून त्यातील काही गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्याचे जाहीर केले आहे. तेंव्हा प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वे विभागाच्यावतीने केले आहे.
मनमाड दौंड मार्गावर दुहेरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू असुन कोपरगांव तालुक्यातील कान्हेगांव ते पुणतांबा दरम्यान प्री नॉनइंटरलॉकींग कामासाठी दहा दिवसांचा मोठा रेल्वेब्लॉक घेण्यांत आला असुन २८ जुन पर्यंत या मार्गावर धावणां या बहुतांष रेल्वेगाड्या रदद करण्यांत आल्या असुन काहींच्या मार्गात बदल करण्यांत आला आहे या दुहेरी रेल्वेमार्गामुळे कॉसिंगसाठी लागणारा तीस मिनीटांचा अवधी कमी होणार आहे.
दौंड मनमाड या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पुर्ण होईल. या मार्गावरून दररोज २८ रेल्वेगाड्या धावतात त्यातुन सुमारे ७० हजार प्रवासी रेल्वेप्रवास करतात.
वीरांगणा राणी लक्ष्मीबाई झांशी (२६ जून रद्द), झाशी स्पेशल (२० व २७ जून रद्द), नांदेड हडपसर स्पेशल, हडपसर नांदेड (२० जुन), जबलपुर पुणे (२३ जुन), पुणे जबलपुरे स्पेशल (२४ जुन), मुंबईहुन शिर्डीकडे व शिर्डीकडुन मुंबईला जाणा-या साईनगर शिर्डी व वंदे भारत एक्सप्रेस (२९ व ३० जुन), दादरहुन साईनगर शिर्डीला व शिर्डीकडुन दादरला जाणारी साईनगर साप्ताहिक सुपरफास्ट (२८ व २९ जुन), त्याप्रमाणे त्रि साप्ताहिक सुपरफास्ट (२९ व ३० जुन), दादर साईनगर शिर्डी पुणे मार्गे (२९ जुन), व साईनगर शिर्डी दादर (३० जुन) या रेल्वेगाड्या रदद करण्यांत आल्या आहेत.
तर २५ ते २९ व २६ ते ३० जुनपर्यंत पुणे नांदेड व नांदेड पुणे एक्सप्रेस कुरूडवाडी, लातुर, परळी परभणी मार्गे धावेल, २७ व २८ जुन रोजी जम्मुतावी पुणे झेलम एक्सप्रेस मनमाड कोपरगांव नगर दौंड ऐवजी इगतपुरी कल्याण, पनवेलमार्गे पुण्यांस जाईल, २८ व २९ जुन रोजीची हजरत निजामुददीन वास्को गोवा एक्सप्रेस मनमाड कोपरगांव नगर दौंड ऐवजी इगतपुरी कल्याण पनवेलमार्गे धावेल, १९ ते२१ व २४ ते २५ आणि २७ ते २८ जुन रोजी पुणे अमरावती हुतात्मा एक्सप्रेस तिच्या निर्धारीत वेळेपेक्षा ९० मिनीटांनी उशीरा पुणे स्थानकातुन सुटेल त्याचप्रमाणे शिर्डी रेल्वेस्थानकाहुन साईनगर शिर्डी दादर साप्ताहिक सुपरफास्ट २२ जुन रोजी ६० मिनीटे उशीरा सुटेल, हडपसर गुवाहरी विशेष रेल्वे २७ जुन रोजी निर्धारीत वेळेपेक्षा अडीच तास हडपसर रेल्वेस्थानकातुन सुटणार आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी., कोरोना काळानंतर रेल्वेचा या मार्गावरील हा सर्वात मोठा ब्लॉक आहे त्यामुळे ज्या रेल्वेप्रवाशांचे अगोदरचे बुकींग होते त्यांना अन्य खाजगी वाहनांचा पर्याय शोधावा लागणार असुन त्यासाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागतील.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मीक स्थान असल्याने येथे साईबाबांच्या दर्शनासाठी बहुतांष भाविक रेल्वे प्रवासाला विशेष पसंती देत असतात त्याप्रमाणे ते नियोजन देखील करतात पण प्री नॉनइंटरलॉकींग कामामुळे साईभक्तांसह त्यावर अवलंबुन असणा-या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे., तर रेल्वेप्रवासात गुडदाणी, शेंगा, चिक्की, शेंगदाणे, भेळ, फळे, पाणी, विविध खाद्यपदार्थ आदि गरजेचे साहित्य विक्री करणा-यांच्या मजुरीवर कु-हाड कोसळली आहे.
Post Views:
65