नाशिक शिक्षक मतदार संघात  सरासरी सुमारे 84.86 टक्के मतदान

नाशिक शिक्षक मतदार संघात  सरासरी सुमारे 84.86 टक्के मतदान

Average voter turnout in Nashik Teacher Constituency is about 84.86 percent

नंदुरबार सर्वात जास्त (90.25%)टक्के मतदान; जळगाव सर्वात कमी टक्के (83.61%) मतदानNandurbar highest (90.25%) polling percentage; Jalgaon has the lowest percentage (83.61%) voting

कोपरगावात सरासरी 94 टक्के मतदानAverage voter turnout in Kopargaon is 94 percent

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed26June , 20.00 Pm.By सालकर राजेंद्र 

कोपरगाव :  नाशिक शिक्षक मतदार संघात  सरासरी सुमारे 84.86 टक्के मतदान  झाले यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात जास्त (90.25%) टक्के मतदान; तर जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी टक्के(83.61%) मतदान झाले अशी माहिती निलेश सागर सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. तर कोपरगाव मतदार संघात कोपरगाव तालुक्यात सरासरी 94 टक्के मतदान झाले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी दिली

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी विभागातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये  बुधवारी 26 जून रोजी मतदान घेण्यात आले. विभागातील 69 हजार 368 शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याकरिता विभागात 90 मतदान केंद्रे निश्चित केली होती . सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. 
नंदुरबार – (90.25%),धुळे -(86.59%), जळगाव – (83.61%) नाशिक – (85,35%) अहमदनगर – (82,62%) असे असुन  यात  दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 
नाशिक शिक्षक मतदार संघात सकाळी 7  ते सायंकाळी 5
जिल्हानिहाय असलेले मतदान
नंदुरबार पुरूष 4052 महिला 1341 इतर 0 एकुन 5393धुळे पुरूष 6203 महिला 1956 इतर 0 एकुन 8159
जळगाव पुरूष 9673 महिला 3449
इतर 0 एकुन 13122
नाशिक पुरूष 14713 महिला 10589 इतर 0 एकुन 25302
अहमदनगर पुरूष 11862 महिला 
5530 इतर 0 एकुन 17392
नाशिक मतदार संघात पाच जिल्हे मिळून एकुण पुरूष 46503 महिला 22865  इतर 0 एकुन 69368 मतदान होते. 
या निवडणुकीसाठी 21  उमेदवार निवडणूक रिंगणात होते विभागात एकूण मतदार : 69368 पुरुष मतदार : 46503४, महिला मतदार : 22865  असून पैकी  झालेले जिल्हानिहाय  मतदान 
नंदुरबार पुरूष 3586(89%) महिला 1279 (95%) इतर (0%) एकुन 4867 (90.25%)
धुळे पुरूष 5345 (86%)महिला  1720(88)%इतर (0%) एकुन 7065 (86.59%)
जळगाव पुरूष 7994(83%)
 महिला 2977(86%) इतर (0%) एकुन 10971(83.61%)
नाशिक पुरूष 12466(85%)
 महिला  9130(86%)इतर( 0%) एकुन 21596 (85,35%)
अहमदनगर पुरूष 9560(81%)
 महिला 4810(87%)
 इतर (0%) एकुन 14370(82,62%)
नाशिक मतदार संघात पाच जिल्हे मिळून एकुण पुरूष 38953(84%)
महिला 19916(87%)इतर (0%) एकुन  मतदान 58869 (84.86%)
महाविकास आघाडीचे ॲड.संदीप गुळवे बिघाडी झालेल्या महायुतीचे उमेदवार किशोर दराडे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ॲड.  महेंद्र भावसार या चार उमेदवारासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे
कोपरगाव मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तर आमदार किशोर दराडे, यांनी भेटी दिल्या. अमितदादा कोल्हे दिवसभर मतदान केंद्र बाहेर ठाण मांडून होते. आशुतोष काळे व काळे कोल्हे यांचे समर्थक कार्यकर्ते दिवसभर मतदान प्रक्रियेत सक्रिय होते.आमदार दराडे यांना आमदार आशुतोष  काळे स्वतः गाडी चालवत दुपारी   गौतम बॅंकेकडे घेऊन जाताना दिसले 
१ जुलै रोजी मतमोजणी
शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २६) मतदान पार पडणार आहे. दि. १ जुलै रोजी विभागाची एकत्रित मतमोजणी नाशिकच्या अंबड येथील वेअर हाउसमध्ये होणार आहे. त्यासाठी मतदान पार पडल्यानंतर त्या-त्या जिल्ह्यांमधील मतपेट्या एकत्रितरीत्या बंदोबस्तात येथे आणल्या जातील.

चौकट

कोपरगाव बूथ क्र. 77-एकुन मतदान (1082)झालेले मतदान यात पुरूष 656 (95.07%) महिला 377 (96.17%)इतर (0%) एकुन  मतदान  1033(95.47%) अशी माहिती तहसीलदार गौतम गंभीरे यांनी दिली

कोपरगाव बूथ क्र. 78-एकुन मतदान (1086)झालेले मतदान यात पुरूष 648 (91.65%) महिला 348 (91.82%)इतर (0%) एकुन  मतदान  996(91.71%) अशी माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली

नगर जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी दिली

 

Leave a Reply

You cannot copy content of this page