कोपरगावातील’इतक्या’  इमारती बनल्या धोकादायक; नगरपालिकेने मालकांना धाडली नोटीस

कोपरगावातीलइतक्या‘  इमारती बनल्या धोकादायक; नगरपालिकेने मालकांना धाडली नोटीस

‘So many’ buildings in Kopargaon become dangerous; The municipality issued a notice to the owners

नदी, नाल्याकडे असणाऱ्यांनी अतिक्रमणे काढून घ्यावीत!The encroachments should be removed by those who are near the river and drain

पावसाळ्यात धोकादायक घरे, इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी येथील नगरपंचायतीने शहरातील ८४ इमारत मालकांना नोटिसा बजावल्‍या आहेत. The municipality here has issued notices to 84 building owners in the city to prevent dangerous houses and buildings from collapsing and causing financial loss.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu27June , 16.10 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव  : सुरक्षिततेचा उपाय म्हणून येथील नगरपंचायतीने (Kopargoan Nagar Palika) शहर हद्दीतील ८४ धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावल्‍या आहेत. त्याचप्रमाणे ज्‍यांची घरे कमकुवत झाली असतील, त्‍यांनी पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी करून घ्यावी.  नदी, नाल्याकडे असणाऱ्यांनी अतिक्रमणे काढून घ्यावीत, धोकादायक घरांबाबत सक्षम प्राधिकरणाकडून स्थलदर्शक तपासणी करून घेण्याचेही आवाहन केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी सुहास जगताप म्हणाले
मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नगरपालिकेच्या नगर रचना विभागाच्या वतीने चार जणांच्या पथकाने केलेल्या सर्वे मधून ही माहिती समोर आली आहे.
 मॉन्सूनपूर्व (Pre-monsoon) कालावधीत वाहणारे जोरदार वारे तसेच पावसाळ्यात धोकादायक घरे, इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी येथील नगरपालिकेने  शहरातील ८४ इमारत मालकांना नोटिसा बजावल्‍या आहेत. सर्वाधिक धोकादायक इमारती,घरे गावठाण भागात आहेत.
नोटीसमध्ये  म्‍हटले आहे, की महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम १९६५ चे कलम १९५ (१) अन्वये नगरपालिका  हद्दीतील ज्‍या मिळकत धारकांच्या घरांचा कोणताही भाग धोकादायक स्थितीत पडावयास झालेला असल्यास तो भाग त्वरित नगरपालिकेच्या रीतसर पूर्वपरवानगीने काढून टाकावा.
जुन्या इमारतीची (Buildings) योग्य त्या सक्षम प्राधिकरणाकडून स्थलदर्शक तपासणी करून त्या प्राधिकरणाकडून सुचविलेल्या दुरुस्त्या कराव्यात. जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करावयाचे झाल्यास तसे नगरपालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन बांधकाम  करावे.   परवानाधारक यांचे मार्फत इमारतीचे (रचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र) घेवून नगरपरिषद कार्यालयात रितसर अर्ज करुन सादर करावे.
घरातील तसेच, अन्य रहिवाशांच्या जीविताचे रक्षण करावे. मोडकळीस आलेली इमारत असल्यास रस्त्याने येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी  सुहास जगताप  यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page