कोपरगाव लोकअदालतमध्ये तब्बल ३ हजार २१३ प्रकरणे निकाली: ६ कोटी रूपयांचे झाले समझोते;
As many as 3 thousand 213 cases were settled in Kopargaon Lok Adalat: 6 crores of rupees were settled;
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sun28July , 21.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव तालुका विधी सेवा समिती कोपरगाव व कोपरगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तब्बल ३ हजार २१३ प्रकरणे निकाली निघाली. तर ५ कोटी ९९ लाख १३ हजार ७४७ रूपयांचे समझोते झाले. जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय, सहकार न्यायालय, फौजदारी न्यायालय असे सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी (दि२७) रोजी आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती ॲड. अशोक टुपके यांनी दिली
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी दावे, भूसंपादन प्रकरणे, तडजोडीयोग्य फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, विद्युत अधिनियमाची प्रकरणे, पराक्रम्य लेख अधिनियम कलम १३८ ची प्रकरणे, कामगार वाद, रक्कम वसुली प्रकरणे, ट्रॅफिक ई-चालान प्रकरणे आणि इतर दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने निपटारा करण्यासाठी ठेवण्यात आली. त्यास हजारो नागरिकांनी व पक्षकारांनी सहभाग नोंदवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
लोक अदालतीमध्ये १७२८ प्रलंबित प्रकरणे व ७८९८ दाखलपूर्व अशा एकूण ९६२६ प्रकरणांचा समावेश होता. पैकी १४८ प्रलंबित प्रकरणे व ३०६५ दाखलपूर्व अशी एकूण ३२१३ प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली यात प्रलंबित प्रकरणे ४ कोटी ८८ लाख ३३ हजार ३९९ तर दाखल पूर्व प्रकरणात १ कोटी १० लाख ८० हजार ३७८ रुपये असे एकूण संबंधीत पक्षकारांना एकूण ५ कोटी ९९ लाख १३ हजार ७४७ रूपयांचे समझोता रक्कमेचा लाभ मिळाले तसेच विशेष बाब म्हणजे या लोकअदालतीचे माध्यमातून काही घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणांतील पती पत्नी यांच्यामध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होउन ते एकत्रीत राहाण्यास गेले. तसेच याव्यतिरिक्त अनेक ट्रॅफिक ई-चालान प्रकरणे देखील समझोत्याने निकाली काढण्यात आली.
कोपरगाव तालुका विधी सेवा समिती व कोपरगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे राहता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अनेता यांच्या हस्ते शनिवारी सकाळी (दि २७) रोजी लोक अदालतचे उद्घाटन करण्यात आले. प्रलंबित प्रकरणे व दावा दाखलपूर्व प्रकरणे हाताळण्याकरीता कोपरगाव येथील दिवाणी न्यायाधीश स्वरूप बोस , दिवाणी न्यायाधीश भगवान पंडित, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश सौ. एस. एम. बनसोड मॅडम, सहकार न्यायालयाचे न्यायाधीश राजेंद्र दांडगे, उपस्थित होते. त्याचप्रमाणे कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बाळासाहेब वहाडणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अशोक टुपके यांनी केले होते.
पाच पॅनल तयार करण्यात आले होते . त्या पॅनलमध्ये सध्या कार्यरत असलेले व सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी, वकील व समाजसेवक यांचा समावेश करण्यात आला होता.
चौकट
जोडप्यांमध्ये आपसी समझोता
विशेष बाब म्हणजे पती व पत्नी यांचेमधील घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणे देखील लोक न्यायालयासमोर ठेवण्यात आली होती. अश्या प्रकरणांपैकी अनेक जोडप्यांमध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होऊन ते एकत्र नांदावयास गेले असून त्यांचा पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू होणार आहे.
Post Views:
95