ऑगस्टपासून राष्ट्रवादीअजित पवार गटाची जनसन्मान यात्रा-  खा. सुनील तटकरे

ऑगस्टपासून राष्ट्रवादीअजित पवार गटाची जनसन्मान यात्रा-  खा. सुनील तटकरे

Jan Sanmanman Yatra of NCP Ajit Pawar group from August – Kha. Sunil Tatkare

आ. आशुतोष काळे १००१% निवडून येणार- खा. सुनील तटकरे come . Ashutosh Kale will be elected 1001%- Kha. Sunil Tatkare

 

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon29July ,16.00 Pm.By सालकर राजेंद्र 
 

कोपरगाव : जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने रविवारी (२८जूलै) रोजी दुपारी  पाच वाजता कोपरगाव येथील कृष्णाई बँक्वेटमध्ये  सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला.  

यावेळी बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले दोन महिन्यांनी निवडणुकीला सामोरे जायचं आहे.  बहुजन हिताचे नवे पर्व सुरू करायचे आहे यासाठी अधिक पाठबळाची  अपेक्षा  आहे त्यामुळे हे निर्णय लोकांपर्यंत कसे पोचतील, राजकीय विचारधारा, जनतेच्या दृष्टिकोनातून घेतलेले क्रांतिकारी निर्णय या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत कसे पोहोचवता येतील हा या यात्रेमागचा हेतू आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी कोपरगाव येथे दिली.
 खा. तटकरे पुढे म्हणाले, सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावा अर्थसंकल्प मांडला. राज्याच्या अर्थकारणाला, समाजकारणाला, ग्रामीण भागाला आणि सर्वांना ताकद देणारा अर्थसंकल्प राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मांडला गेला. अजित दादांची जनसन्मान यात्रा आम्ही ऑगस्टपासून सुरू करत आहोत. त्याची सुरुवात नाशिकमधून करत आहोत. सर्व घटकांशी अजितदादांचा थेटपणे संवाद होणार आहे. माझी लाडकी बहीण योजना, महिलांना बळ देणारी  क्रांतिकारी योजना असून सर्वाधिक खर्चाची योजना असून यातून  ४६ हजार कोटी रुपये सर्वाधिक खर्च केला आहे त्याचप्रमाणे  तीन गॅस सिलेंडर मोफतचा लाभ ५६ लाख महिलांना मिळण्याची शक्यता आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजना, अडीच ते सात हॉर्स पॉवर पंपांच्या थकीत बिल माफ होऊन बारा तास वीज शेतकऱ्यांना मोफत मिळणार यासाठी १४ हजार कोटी,  १० हजार रुपये महिना १० लाख तरुणांना १० हजार कोटीची  योजना आहे, दूध पावडर आयातीवर बंदी आणण्यात आली आहे अशा अनेक योजना राबवल्या जाणार आहेत.

  खा. तटकरे पुढे म्हणाले, युतीत सामील झाल्यानंतर आ. आशुतोष काळे  परदेशात होते  परंतु ते आपल्यातच येतील असा  पराकोटीचा विश्वास अजितदादांनी आ. आशुतोष काळे  या तरुणावर  दाखवला होता.  आ. आशुतोष काळे एक हजार एक टक्के निवडून येणार आहेत.  बैठकीला उशिरा येणार पण हातात कागद घेऊनच मग  कामे कशी करून घ्यायची याचे कसब आशुतोष काळे यांच्याकडे आहे. सत्ता हे सेवेचे  प्रभावी साधन आहे  आशुतोष काळे यांना कोपरगावात  आजचा कार्यक्रम घ्यायचा नाही  असे  विरोधकांकडून पसरविले गेल्याचा गौप्यस्फोट   खा. तटकरे यांनी केला. यावेळी आ. काळे यांना तुम्ही  तरुण असल्याने त्यांनी केवळ कोपरगाव मतदार संघापुरते मर्यादित न राहता तुमच्या शक्तीचा उपयोग करून आजूबाजूला फिरा राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळाची ताकद बलवान करा  अशा सूचना केल्या  महायुती म्हणूनच आपल्याला लढायचे आहे  जागावाटप आमच्यावर सोडा जागावाट्याच्या संदर्भात कुठलाही मतभेद नाही. निवडून येण्याची क्षमता, सीटिंग उमेदवार या सर्व गोष्टींची निर्णय आम्ही घेणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

  यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले  अजित पवार यांनी भरघोस निधी दिला कोपरगावचा कायापालट झाला सर्वांचे सहकार्य, अजितदादांचा आशीर्वाद लाभला, विकासात अजितदादांचा हात कोणीच धरू शकत नाही. अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी  २०१९ च्या निवडणुकीप्रमाणेच २०२४ च्या निवडणुकीत जोश आणि ताकदीने उतरून आपलं काम मतदारापर्यंत पोहोचवा, ज्या काही योजना आहेत त्या  लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा कामे झाली आहेत. आता फक्त प्रचार प्रसार करा,  समोरचे भुलथापा देऊन लक्ष विचलित करतील, ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना  जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्या पार पाडाव्या  राष्ट्रवादीचे विचार  तळागाळापर्यंत पोहोचवा,  संभ्रम न ठेवता  मतदारांची मने जिंका,  आज मी आमदार आहे  पुढेचाही  आमदार मीच राहणार आहे.   सरकार महायुतीचे येणार मुख्यमंत्री अजित पवार होणार असा आत्मविश्वास आमदार काळे यांनी शेवटी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे महिला अध्यक्ष महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आ. आशुतोष काळे, प्रशांत कदम कपिल पवार, सुरज चव्हाण, सुनील मगरे, इंद्रजीत नाईकवाडे, बाळासाहेब नाहाटा या राज्यपदाधिकाऱ्यांसह सुनील गंगुले, चारुदत्त सिनगर आदिसह महिला पदाधिकारी हजर होत्या.
कार्यक्रमाची प्रास्ताविक युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी केले सूत्रसंचालन अरुण चंद्रे सर यांनी केले तर शेवटी आभार सुनील गंगुले यांनी व्यक्त केले.
यावेळी मंजूर येथील तांगतोडे बंधूंचा जीव वाचविणाऱ्या ताईबाई व कारभारी पवार यांचा सुनील तटकरे रूपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात साडी चोळी व पोशाख देऊन सत्कार करण्यात आला
 
यावेळी माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला त्यांचाही सत्कार करण्यात आला 

चौकट 

आम्ही आशुतोष काळे यांना निवडून आणले अजित पवार यांनी भरघोस निधी दिला आता पुन्हा एकदा आ.आशुतोष  काळे यांना आम्ही निवडून आणू तुम्ही त्यांना मंत्री करण्याची शिफारस करा  असे कृष्णा आढाव यांनी म्हणताच  दादांना जलमंत्री करा अशी मागणी टाळ्याच्या गजरात उपस्थितांनी केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page