दोघांचे आयुष्य वाचविणाऱ्या ताईबाईचीशौर्य पुरस्कारासाठी शिफारस करावी – स्नेहलता कोल्हे 

दोघांचे आयुष्य वाचविणाऱ्या ताईबाईचीशौर्य पुरस्कारासाठी शिफारस करावी – स्नेहलता कोल्हे 

Taibai who saved two lives should be recommended for bravery award – Snehalata Kolhe

 

कोपरगाव : आपला जीव धोक्यात घालून प्रसंगावधान राखत साडीचा दोर करून गोदावरी नदीत बुडणाऱ्या तीन पैकी दोघा मुलांना मोठ्या धाडसाने वाचविण्यासाठी अतुलनीय शौर्य दाखविणा-या ताईबाई छबुराव पवार या ४२ वर्षीय मेंढपाळ महिलेची  तत्परतेने दखल घेत त्यांना शौर्य पुरस्कार देण्यात यावा म्हणून शिफारस करायचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ठरवले आहे. तशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केली आहे

संकटसमयी जीव धोक्यात टाकून साहस दाखवणा-या धाडसी व्यक्तींना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.ताईबाई पवार यांच्या कामगिरीची दखल घेऊन शासनाने त्यांची  शौर्य पुरस्कारासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करावी अशी मागणी  स्नेहलता कोल्हे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 
कोपरगाव तालुक्यातील मंजूर गावातील तरुण  संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे सख्खे भावंडे नदीतील मोटारी काढण्यासाठी  गोदावरी नदीच्या पात्रात उतरले. मात्र  पाण्याचा जोर जास्त असल्याने  तिघे भाऊ पाण्यात  वाहून जातांना बुडत असल्याचे पाहून शेजारीच शेळ्या  चारणाऱ्या ताईबाई छबूराव पवार आणि पती छबूराव बाबूराव पवार यांनी ही घटना पाहिली. क्षणाचाही  विचार न करता  शेळ्या चारणाऱ्या ताईबाई पवार यांनी प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि  त्या साडीला धरून प्रदीप  आणि अमोल दोन भाऊ पाण्यातून बाहेर पडले त्यांचे प्राण वाचले.  राज्यसरकारने ताईबाई यांची दखल घ्यावी. या  धाडसी कार्याबद्दल शौर्य पुरस्कार देण्यासाठी शिफारस करावी अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे. 
 

Leave a Reply

You cannot copy content of this page