जातीयवादाच्या षडयंत्राला बाहेरील अज्ञात शक्तींचे आर्थिक पाठबळ- मेधा कुलकर्णी
Financial support from outside unknown forces to the conspiracy of communalism- Medha Kulkarni
ब्राह्मण समाजाबद्दल काळेकडून कृतज्ञता, तर कोल्हेंकडून चिंता व्यक्तBlacks expressed gratitude towards the Brahmin community, while Kolhes expressed concern
मेधा कुलकर्णीकडून १० लाख निधीची घोषणा10 lakh fund announcement by Medha Kulkarni
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon29July ,16.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगांव : आरक्षणाच्या नावाखाली विशिष्ट जातीला लक्ष करुनजातीयवाद वाढीस लागला आहे पूर्वीच्या काळी ब्रिटीशांना तो हवा होता सद्यस्थितीला राजकिय परिस्थिती विचित्र अवस्थेतून जात आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची षडयंत्र रचले जात आहे त्यासाठी मोठयाप्रमाणातबाहेरील अज्ञात शक्ती आर्थिक पाठबळ देत असल्याचा आरोप राज्यसभेच्या उपसभापती खा.सौ. मेधा कुलकर्णी यांनी कोपरगाव येथे ब्राह्मण सभेच्या एका कार्यक्रमात अध्यक्षपदावरून केले
ब्राम्हण सभेसाठी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या १० लाख रूपयांच्या निधीतील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन , विद्यार्थी गुणगौरव व ब्रह्मपुरस्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या
ब्राम्हण सभेच्या वतीने झालेल्या कार्यक्रमप्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विश्राम कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, एैश्वर्या सातभाई, व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक अध्यक्ष मकरंद कोर्हाळकर यांनी केले.
बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी ब्राम्हणसभेच्या सभागृहात खा.भाऊसाहेब वाकचौरे तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रत्येकी ५ लाखाचा,माजी आमदार सुधीर तांबे यांनी १० लाखाचा निधी दिला तसेच समाजाच्या सभागृहासाठी अनेक दानशुर व्यक्तींनी मदत केल्याची माहिती दिली.
मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या, जातीयवाद निर्माण करुन हिंदुधर्मियांत फूट पाडून आपली पोळी भाजण्याचे काही विरोधक काम करीत आहेत. त्यासाठी सावरकरांच्या सामाजिक तत्वानुसार सर्व हिंदू समाज कसा संघटीत होईल हीच काळाची गरज निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदीचे नेतृत्व देशाला जागतिक पटलावर पुढे नेत आहेत. हिंदु समाज एकत्रित यावा म्हणून त्यांनी सनातन धर्माचे त्यांनी विविध दाखले देवून त्याचे विवेचन केले
आ. आशुतोष काळे यांनी ब्राम्हण समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करुन यापुढेही मी समाजासाठी मदत करण्याची भावना व्यक्त केली.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही सध्याच्या राजकिय परिस्थितीवर व जातीजातीत भेद निर्माण करण्याचे काम सुरु असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत समाजासमाजात निर्माण होत चाललेली मोठी दरी कमी करण्याचे आवाहन यावेळी केले.
ब्राम्हण सभेचे उपाध्यक्ष गोविंद जवाद, बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, सहसचिव संदीप देशपांडे, खजिनदार जयेश बडवे, सहखजिनदार योगेश कुलकर्णी, संघटक महेंद्र कुलकर्णी, गौरीश लव्हरीकर, जेष्ठ मार्गदर्शक सुधाप्पा कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,बांधकाम समिती प्रमुख प्रसाद नाईक, वसंतराव ठोंबरे, संजीव देशपांडे, डॉ. मिलिंद धारणगावकर, अनिल कुलकर्णी, अॕड.सौ.श्रद्धा जवाद, सौ. वंदना चिकटे, अजिंक्य पदे, सदाशिव कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.
जेष्ठ पत्रकार कै .सदाशिव कुलकर्णी यांना मरणोत्तर ब्रम्हचैतन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी ब्राम्हण सभेचे पदाधिकारी, समाज बांधव,गुणवंत विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनिता कोऱ्हाळकर ,सौ.वृषाली कुलकर्णी यांनी केले. आभार सहसचिव संदीप देशपांडे यांनी मानले. ब्राम्हणसभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
चौकट
राज्यसभेच्या उपभापती खा.मेधा कुलकर्णी यांनीही ब्राम्हण सभेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या प्रस्तावावर लगेचच १० लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली.
आ. काळे यांना जातांना मेधा कुलकर्णी यांनी आम्हाला पैसे किंवा निधी देण्याबरोबरच नैतिक पाठबळ व मायेचा आधार द्यावा अशी टिपण्णी केली त्यावर उपस्थितांनी टाळया वाजवून त्यास दाद दिली.
Post Views:
60