केदारनाथमध्ये ढगफुटी, अडकलेले कोपरगावातील ५५ भाविक सुखरूप,– आ. काळे
Cloud burst in Kedarnath, trapped 55 devotees of Kopargaon are safe,- the Kale
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 2 Aug 17.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : केदारनाथमध्ये ढगफुटी, अडकलेले कोपरगाव मतदारसंघातील ५५ भाविकांची आ. आशुतोष काळे यांनी भ्रमणध्वनीवरून विचारपूस केली ते सुखरूप असल्याचे कळताच सुटकेचा श्वास सोडला व काळजी घ्या असे सांगून दिलासा दिला आहे
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात केदारनाथ मंदिराच्या सुमारे ४ किमी अलीकडे ढगफुटी झाली आहे. ही घटना बुधवार रात्री ९ वाजता गौरीकुंडाच्या पुढे रामवाडा व जंगल चट्टीदरम्यान पायी मार्गावर घडली. यामुळे काही मिनिटांतच अनेक मिमी पाऊस झाल्याने पर्वतांवरून दरडी कोसळल्या. रस्त्याचा ३० मीटर भाग तुटून खवळलेल्या मंदाकिनी नदीला जाऊन मिळाला. घटनेदरम्यान प्रवासी मार्ग रिकामे होते, पण मंदिर प्रांगण, रामवाडा, गौरीकुंडात प्रवासी हजर होते. येथे २०० पेक्षा जास्त भाविक अडकले आहेत. त्यांना काढण्यासाठी तातडीने एसडीआरएफ जवानांना गौरीकुंड येथे रवाना केले.
केदारनाथ यात्रेला दगडी ढिगाऱ्यांमुळे सुमारे ३० मीटर चालण्याच्या मार्गाचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पादचारी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भीमबली येथे सुमारे १५० ते २०० यात्रेकरू अडकले आहेत. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पावसामुळे भूपतवाला, हरिद्वार, न्यू हरिद्वार, कंखल, ज्वालापूर येथील अनेक वसाहती आणि बाजारपेठांची दुरवस्था झाली असून, सर्वत्र जलमय झाले असल्याच्या बातम्या येत आहेत.
दरम्यान या यात्रेत कोपरगाव मतदार संघातील ५५ भाविक असल्याचे कळताच आ. आशुतोष काळे यांच्या काळजात धस्स झाले आपल्या व्यस्त कार्यक्रमाला फाटा देत आमदार काळे यांनी तातडीने चौकशी करत भ्रमणध्वनी मिळवून भाविकांशी संपर्क साधला सर्वजण सुखरूप असल्याचे कळताच सुटकेचा श्वास घेतला. आमदार काळे यांनी चौकशी केल्यानंतर अडकलेल्या भाविकांना दिलासा मिळाला यावेळी भाविकांनी येथील भयानक परिस्थितीची माहिती सांगितली. स्थानिक प्रशासन आम्हा सर्व भाविकांना सर्वोतोपरी सहकार्य करत असून आम्ही सर्वजण सुखरूप असून गुप्तकाशी जवळ नारायणकोट येथे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण आमची आस्थेवाईकपणे चौकशी केल्यामुळे आम्हाला निश्चितपणे पुढील प्रवासासाठी बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाविकांशी बोलताना आमदार काळे म्हणाले आमदार काळे म्हणाले प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील ४८ तासांत उत्तराखंडमधील सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हा इशारा मंगळवारी रात्रीपासून लागू झाला आहे. डेहराडून, टिहरी, पौरी, नैनिताल, हरिद्वार, उधम सिंह नगर आणि चंपावत जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट आ जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेंव्हा भाविकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास संपर्क करा, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नका, आहे तेथे सुरक्षित रहा, आणि सुखरूप माघारी परत या अशा काळजीवजा सूचना दिल्या..
Post Views:
58