सामान्यांचा ‘आवाज’ आ. आशुतोष काळे
The ‘voice’ of the common man. Ashutosh Kale
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat 3 Aug 17.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : जनसामान्यांच्या कामाचा धडाका, विकासकामांत सदैव अग्रेसर, जनतेशी थेट संपर्क साधणारे नेतृत्व म्हणून ख्याती मिळवणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचा आज जन्मदिन त्यानिमित्ताने…
अंबिकानगर जिल्ह्याचे राजकारण राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा स्पर्धात्मक आहे. कर्मवीर शंकरराव काळेंचा वसा आणि वारसा लाभलेल्या या तालुक्यात उद्योगाचे व्यापक महत्त्व, उत्तम शेती, पतसंस्था, दूध संस्था, सेवा सोसायट्या, जिनिंग आणि शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचे असणारे साखर कारखाने हे सगळे सहकाराशी निगडित आहे. असा हा तालुका. पोहेगाव, टाकळी, सुरेगाव, धामोरी कोळपेवाडी संवत्सर , चासनळी, माहेगाव देशमुख, सोनेवाडी, चांदेकसारे, रांजणगाव देशमुख, येसगाव, शिंगणापूर व वारीगाव येथे असणाऱ्या मोठ्या बाजारपेठा अशा रचनेतून कोपरगाव परिसराचे अर्थकारण उभे राहते. ऐतिहासिक,पौराणिक, धार्मिक स्थळे, उत्तम शैक्षणिक संस्था, समृद्ध अशी धार्मिकसंस्कृती आहे. रस्ते, रेल्वे, विमान सर्व प्रकारच्या दळणवळणाचे मध्यवर्तीस्थान आहे.अशा या तालुक्यात महत्त्वाकांक्षी कल्पक नजरेतून धाडसी आणि कार्यमग्न कार्यकर्त्यांची फळी उभा करण्याचे कामही आशुतोष काळे यांनी केले आहे.
राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक हित जोपासण्याचे काम आमदार काळे नेहमीच करतात. गौतम बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याअडीअडचणी सोडवण्याचे काम असेल किंवा कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी असेल किंवा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाशी निगडित समस्या आमदार आशुतोष काळे यांच्याकडून हमखास सुटणार असे मानले जाते त्यामुळेच सामान्य माणूस त्यांना आधार मानतो.
जनतेची कामे करत हजारो कोटींचा निधी तालुक्यात विकासकामांसाठी आणि आरोग्यासाठी सरकारच्या तिजोरीतून खेचून आणत लोकप्रतिनिधींचे कार्य संकटकाळी कसे असावे, याचे उत्तम व आदर्शवत उदाहरण राज्यासमोर ठेवण्याचे काम कोरोना काळात आमदार असताना आशुतोष काळे यांनी केले.
समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड अत्यंत महत्त्वाची असते. त्यांच्या धडपडीतूनच त्या त्या मतदारसंघाला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांच्या हातून होत असते. त्याच पद्धतीने आमदार काळे यांनी प्रचंड विकासकामांच्या जोरावर सामान्य जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.
राजकीय कारकिर्दीबरोबरच कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे नेतृत्व स्वीकारले. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून माजी आमदार अशोक काळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली.२०१४ च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचे विरोधात २९ हजार ७६३ मतांनी त्यांचा पराभव झाला या पराभवानंतर खचून न जाता त्यांनी सातत्याने मतदार संघात संपर्क ठेवून मतदार संघातील मुद्दे हेरले, त्यावर अभ्यास केला सर्व स्तरातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले प्रसंगी वेगवेगळ्या विषयावर आंदोलने केली
एक प्रखर विरोधक म्हणून त्यांनी विश्वासहार्यता निर्माण केली. २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत ८२२ मतांनी त्यांनी भाजपाच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला.कोपरगावच्या जनतेने आशुतोष काळे यांना पहिल्यांदा आमदार केलेच. व आमदार म्हणून त्यांनी आजपर्यंत धुरा समर्थपणे सांभाळली. विरोधी आमदार म्हणून निवडून आले परंतु नशीब बलवत्तर म्हणून सेना-भाजप युती फीसकटल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी झाली.आणी सत्तेत आले सत्ताधारी आमदार झाले दोन वर्षानंतर पुन्हा आघाडीची सत्ता गेली युतीची सत्ता आली अजित पवारांबरोबर आशुतोष काळे महायुतीत गेले पुन्हा सत्ताधारीआमदार झाले संपूर्ण पाच वर्ष सत्ताधारी आमदार राहिल्यामुळे शेकडो कोटींची विकासकामे मतदार संघात खेचून आणण्यात त्यांनी बाजी मारली आहे. सामाजिक आणि राजकीय जीवनात सहकार, शिक्षण यासह अन्य सर्वच क्षेत्रांतील त्यांनी केलेले काम हे त्यांच्या राजकीय यशस्वी कार्यपध्दतीचे गमक आहे. एवढ्यावर समाधान न मानता त्यांनी त्याच्या जोडीला मानवतेच्या भावनेतून केलेले काम तर त्याहून कितीतरी पटीने मोठे आहे. त्यांच्या कामाची नोंद घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
लोकांची गर्दी नसली तर ज्यांचा श्वास गुदमरतो अशा मोजक्या आमदारपैकी एक म्हणजे आमदार आशुतोष काळे सकाळीपासून रात्री उशिरापर्यंत जनतेशी निगडित कामे करण्यात वेळ घालवणारे हे नेतृत्व कोपरगाव तालुक्याला लाभलेली देणगी आहे. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत, गाव – घरापासून दिल्लीपर्यंत, घरच्या भांडणापासून राजकीय भांडणापर्यंत सर्व अडीअडचणी सोडवत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, सर्वसामान्याचे समाधान कसे होईल, याकडेच आमदार काळे यांचे लक्ष असते. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याची भावना त्यांनी ठेवली आहे. शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा यासाठी त्यांनी स्वतःची अशी यंत्रणा उभी केली आहे. प्रश्न असेल तो सोडवण्याचा प्रयत्न कुशलतेने त्यांनी केला. त्याचा मतदार संघातील गोरगरिबांना फायदा झाला. कामाचा माणूस अशी ही त्यांची ओळख मतदार संघात आहे. अशा या बहुआयामी युवा नेत्याला वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!
– राजेंद्र सालकर , कोपरगाव
Post Views:
95