निर्धार मेळावा : कोपरगावची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी; ठाकरेंचे शिलेदार आक्रमक
Decision gathering: Shiv Sena should get Kopargaon seat; Thackeray’s Shiledar Aggressor
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सह्यांचे निवेदन दिले Signed statement to party chief Uddhav Thackeray
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 1 Aug 17.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : महाआघाडीत कोपरगाव विधानसभा कोण लढवणार हा पेच अद्याप सुटलेला नाही. मुळात कोपरगाव विधानसभा शिवसेनेच्या बालेकिल्ला असल्याने यावर शिवसेनेचा हक्क आहे मात्र काँग्रेसने नगर जिल्ह्यातील सात जागांवर आपला दावा ठोकलेला आहे यात कोपरगाव विधानसभेचा समावेश आहे दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळावी, यासाठी दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
अशातच शिर्डी लोकसभा असो की कोपरगाव विधानसभा मतदारसंघ गेल्या ३० ते ४० वर्षापासून शिवसेनेचाच आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेनेच्या मशाल चिन्हावरच उमेदवार उभा राहावा, अशी इच्छा कोपरगाव येथील निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले
उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. कोपरगाव विधानसभा १९९२ पासुन शिवसेनेची राहिली आहे या काळात विधानसभेला शिवसेनेचे संभाजी काळे दोनदा, रावसाहेब सोनवणे व नामदेवराव परजणे या उमेदवारांनी चार वेळेस कडवी झुंज दिली यात निसटता पराभव झाला असला तरी शिवसेनेने आपला दबदबा आजपर्यंत कायम राखला आहे. आजपर्यंत कोपरगावातील शिवसैनिकांनी स्वर्गीय भीमराव बडदे दोन वेळा भाऊसाहेब वाकचौरे दोन वेळा सदाशिव लोखंडे असे पाच वेळा खासदार आणि दोन वेळा अशोक काळे तिसऱ्या वेळेस स्नेहलता कोल्हे असे तीन वेळा आमदार निवडून दिलेले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेची जागा असताना युतीमध्ये ही जागा युतीच्या उमेदवार म्हणून भाजपाच्या स्नेहलता कोल्हे यांना दिली. त्यांचा अवघ्या ८२२ मतांनी पराभव झाला राष्ट्रवादीचे आशुतोष काळे निवडून आले आज स्नेहलता कोल्हे आणि आशुतोष काळे दोघेही महायुतीत आहे कोपरगाव विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून दावेदार असलेले आ आशुतोष काळे आज महायुतीमध्ये अजित पवार गटात आहेत. त्यामुळे महाआघाडीत या जागेवर शिवसेनेचाच हक्क आहे. म्हणून मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवावी. असा सूर निर्धार मेळाव्यात उमटला
जागा सेनेची आमच्या बळावर कोणीही निवडून आणू शकतो मग शिवसैनिक का नको ? पक्षप्रमुख जो उमेदवार देतील, त्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे.जरी बाहेरच्या दिले तरी ठाकुन ठोकून घ्या, या भावना पक्षप्रमुखकडे पोहचवा– राजेंद्र झावरे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख
लक्ष मिंधे सरकार गाडण्याचे आहे महाराष्ट्रातूनच जास्त जागा निवडून आणू, त्यात कोपरगावची जागाही आहे, वाकचौरे होऊ शकतात मग झावरे का नाही ? कोपरगाव शिवसेनेचे होमग्राउंड पण त्यासाठी शिवसैनिक उमेदवार हवा तो सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आला पाहिजे, असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.जागा शिवसेनेलाच, सर्वांनाबरोबर घेऊन मशाल चिन्हावरच लढायचे, जागा सोडणार नाही – रावसाहेब खेवरे, जिल्हा प्रमुख , उत्तर नगर
कोपरगाव विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची आहे. अशातच उमेदवार ठरलेला नसताना आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोन्ही पक्षाकडून या जागेसाठी दावा केला जात आहे. याचा आढावा शिवसेना ठाकरे गटाकडून गुरुवारी (१ ऑगस्ट) रोजी व्यापारी धर्मशाळा येथे नगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शहर व ग्रामीण सर्वच शिवसेना पदाधिकारी, तसेच कार्यकर्ता निर्धार मेळाव्यातून घेण्यात आला.
यावेळी उमेदवार कोणीही असला तरी चालेल, पण कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्याने उमेदवाराला निवडून देण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच कोपरगावचा उमेदवार हा मशालचाच असावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. अनेकांनी आपल्या सूचना मांडल्या, मनोदय व्यक्त केला. सर्वांच्या सह्या असलेले हे निवेदन उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी रावसाहेब खेवरे यांच्याकडे देण्यात आले
यावेळी रावसाहेब खेवरे राजेंद्र झावरे, कैलास जाधव,संजय सातभाई, सुनील तिवारी, प्रमोद लबडे, योगेश बागुल, किरण बिडवे, किरण खर्डे, श्रीरंग चांदगुडे, कालुअप्पा आव्हाड, अतुल काले, अश्विनी होने, कलविंदरसिंग दडियाल, प्रविण शिंदे, मनोज कपोते, भरत मोरे, असलम शेख, मुकूंद सिनगर, रवि कथले, संजय दंडवते, राजू शेख, शब्बीर शेख, आदि पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते. शिवाजी ठाकरे यांनी प्रास्ताविक केले राहुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर अस्लम शेख यांनी आभार व्यक्त केले.
शिवसैनिक शिवाजी रोहमारे व महाले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
Post Views:
47