कोपरगाव तालुक्यात मोबाईल व्हॅनद्वारे ‘न्याय आपल्या दारी’उपक्रम संपन्न
In Kopargaon taluka, ‘Nyaya Apna Dari’ initiative was completed through mobile van
तळेगाव मळे व आपेगावात कायदेविषयक शिबिरLegal camp at Talegaon Male and Apegaon
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 5Aug 17.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : समाजातील अगदी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीरासाठी ‘न्याय आपल्या दारी’ हा न्याय रथ रवाना करण्यात आला होता.
तालुक्यात शुक्रवारी दि. २ ऑगस्ट व दि.३ ऑगस्ट या कालावधीत तालुक्यातील काही निवडक गावात हा रथ जाऊन प्रलंबित प्रकरणाचा निकाल लावला जाणार आहे.
या रथाला कोपरगावचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश डी. डी. आलमले यांनी हिरवी झेंडी दाखविली. तालुक्यातील तळेगाव मुळे गावाकडे रवाना करताना त्यांनी फिरते लोक न्यायालयाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. व फिरते लोक अदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी (ता. दोन) ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमख जिल्हा न्यायाधीश डी.डी.आलमले यांच्या शुभहस्ते फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबीर वाहनाची नारळ फोडून विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी दिवाणी वरीष्ठ न्यायाधीश महेश शिलार , कोपरगाव अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक वहाडणे, सहा. सरकारी वकील ॲड. अशोक टुपके न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी उपस्थित होते. फिरते लोक न्यायालय मोबाईल व्हॅनचे वाहन चालक उपस्थित होते.
सदर मोबाईल व्हॅन तालुक्यात तळेगाव मळे व आपेगाव या दोन्ही नियोजीत गावात फिरून न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे सदर लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कायदेविषयक शिबीराद्वारे जनजागृती करण्यात आली आहे आहे.
शुक्रवारी (ता. दोन) रोजी सकाळी तळेगाव मळे ग्रामपंचायत कार्यालय समोर विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश महेश शिलार म्हणाले की, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचा हा प्रयत्न आहे जर गाव पातळीवर छोटे छोटे भांडण,तंटे, कौटुंबिक वाद, भाऊबंदकीचे वाद न्यायालयीन न्यायालयात पर्यंत आणला गाव पातळीवरच न आणता गाव पातळीवरच मिटवल्या एकमेकांचे संबंध संबंधात कटूता येणार नाही न येता सामाजिक स्वास्थ्य राहील व गाव पातळीवर तंटे भेटल्यास न्यायप्रक्रिया वेगवान होईल.
यावेळी तळेगावमळे ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच सौ. आरती टुपके, उपसरपंच अशोक कडू टुपके, ग्रामसेवक सौ, सुवर्णा वडीतके, कामगार तलाठी गणेश वाघ, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील ढेपले, संजय टुपके, संचालक गोदावरी खोरे दूध संघ दादापाटील टुपके, कोपरगाव बाजार समिती माजी संचालक मंजाहरी टुपके, बाळासाहेब टुपके, भीमराज मोकळ, तुकाराम जाधव, पोलीस पाटील सौ. मंगल टुपके, विष्णू क्षिरसागर, जनार्दन भवर, वाल्मीक पिंगळे, तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
शनिवारी (३) रोजी तालुक्यातील आपेगाव ग्रामपंचायत कार्यालय समोर विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश स्वरूप बोस यांनी मार्गदर्शन केले.
कोपरगाव अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक वहाडणे, सहा. सरकारी वकील ॲड. अशोक टुपके
Post Views:
55