जनसन्मान यात्रा: आशुतोष काळेंचा  बालहट्ट पुरवणार त्यांचे तीनही प्रश्न सोडविणार – अजित पवार

जनसन्मान यात्रा: आशुतोष काळेंचा  बालहट्ट पुरवणार त्यांचे तीनही प्रश्न सोडविणार – अजित पवार

Jansanman Yatra: Ashutosh Kalen’s Balhatt will be provided and will solve all his three issues – Ajit Pawar

सर्वसामान्यांचा विचार करून विकासासाठी सत्तेबरोबर गेलो Thinking of common people went with power for development –

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat10 Aug 20.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज दुपारी कोपरगावात आली होती यावेळी त्यांनी आमदार आशुतोष काळे यांनी माझ्याकडे केलेले तीनही प्रश्न बालहट्ट म्हणून मी सोडविणार अशी ग्वाही कोपरगावकरांना साक्षी ठेवून दिली

आ. आशुतोष काळे याने माझ्याकडे अगदी पहाटे मी उठण्याची अगोदर माझ्याकडे येऊन तर कधी माझ्या दालनात येऊन सातत्याने विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच त्यांना ३००० कोटीचा निधी मिळाला  त्यांनी  मतदारसंघासाठी आदिवासी समाजाचे दैवत एकलव्य यांचे तर राजपूत समाजासाठी महाराणा प्रताप या दोन स्मारकांची मागणी केली आहे. तसेच कोपरगाव साठी क्रीडा संकुलाचीही मागणी केली आहे आज पर्यंत त्याचा शब्द खाली पडू दिला नाही पुढेही पडू देणार नाही या तीनही प्रश्नावर लवकरच त्यावर काम होईल. स्मारकाला मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांची जनसन्मान यात्रा आज कोपरगाव येथे आली.                          यावेळी त्यांनी अर्थमंत्री म्हणून आपण केलेल्या कामकाजाचे जोरदार समर्थन केले.  
राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्या आर्थिक तरतुदीतूनच महिलांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे याबाबत विरोधक करीत असलेला अपप्रचार अनाठाई आहे. त्याचा काहीही प्रभाव महिलांवर होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल,  महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर माजी आमदार अशोक काळे चैताली काळे आधी  मान्यवर उपस्थित होते
विरोधक करीत असलेली टीका मी गांभीर्याने घेत नाही, विरोधकांना पंधराशे रुपयांचे महत्त्व कसे कळणार, असा प्रश्न त्यांनी केला. राज्यातील गरीब महिलांना लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पंधराशे रुपये खूप मोठी मदत ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला.यावेळी  विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, “मी गेली दहा वर्ष अर्थमंत्री आहे. दहा वेळा राज्याचे बजेट सादर केले आहे. बजेट सादर करणे काय असते, हे विरोधकांना कळणार नाही. ते येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. विरोधक सत्तेत होते, तेव्हा त्यांनी जनतेला काय दिले?. काहीही दिले नाही. अगदी दीड रुपया देखील दिला नाही , अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. आम्ही राज्यासाठी चांगले औद्योगिक प्रकल्प आणत आहोत. संभाजीनगरसाठी दोन ४०- ४० हजार कोटीची गुंतवणूक असलेले चांगले प्रकल्प येत आहेत. विकासाला पर्यायाने  रोजगाराला चालना मिळेल. 
सत्तेबरोबर गेलो नसतो तर विकास करता आला असता का?  आशुतोष काळेना  ३००० कोटी निधी देता आले असते का ?
जनतेची सेवा करणं हा आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत, असं विधान केलं. एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे. तीन दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून, त्यांचे दु:ख, गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. महिला, युवक-युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत. जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे, अशा शब्दात  अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला आश्वासन दिलं. 
अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे. राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान-सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही अर्ज भरले जात आहेत. तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी उभा आहे”, असा शब्द अजित पवारांनी लाडक्या बहिणींना दिला.19 तारखेला रक्षाबंधन आहे त्यात पूर्वी 17 ऑगस्टपर्यंत”  बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. कालच कॅबिनेट बैठकीनंतर 6 हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज इथे आलो आहे.  तुम्ही साथ द्या. ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.  आम्ही शब्दाचे पक्के आहोत पडेल ती किंमत मोजू.  सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे. वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बिल माफ केले आहे. मागचे पण आणि पुढचेही वीज बिल भरायचे नाहीय.     हे अजित पवारांचं वचन आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं.कांदा असो की ऊस शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे.आता या  योजना चालू ठेवायच्या असेल तर आमच्या विचाराचे सरकार आले पाहिजे केंद्राच्या विचाराचे सरकार आले पाहिजे लोकसभेला संविधान बदलणार आरक्षण काढणार समान नागरी कायदा हटवणार या खोट्या प्रचाराला बळी पडला अल्पसंख्यांक समाज बाजूला गेला पण आमचं सरकार सर्वधर्मसमभावाचा आहे काळजी करू नका, विश्वास ठेवा मनात कसली भीती बाळगू नका भेदभाव नाही सर्व समाजाला मी वेगवेगळे योजनेतून न्याय दिला असल्याचा पाढा त्यांनी वाचला   मग जिथे घड्याळ असेल जिथे धनुष्य असेल जिथे कमळ असेल ते बटन दाबा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार आशुतोष काळे यांनी प्रास्ताविकात अजित पवार यांनी मतदारसंघातील वीज पाणी रस्ते या प्रश्नांसाठी 3000 कोटीचा निधी दिला त्याचप्रमाणे मतदारसंघासाठी आता एकलव्य आणि महाराणा प्रताप यांचा पुतळा त्याचबरोबर क्रीडा संकुल व पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी,  मंजूर बंधाऱ्यासाठी निधी दिल्याबद्दल  आभार व्यक्त केले व त्यांचा सत्कार केला.

चौकट

तुम्हाला निधी कमी पडू दिला नाही तुमच्या मनात जे तेच होईल परंतु राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी आशुतोष काळे यांना प्रचंड मतांनी विजयी करून निवडून द्या – अजित पवार

Leave a Reply

You cannot copy content of this page