कोपरगावात आजपासून “शिवसेना” ठाकरे  गटाचे ‘भगवा सप्ताह’ अभियानास सुरुवात 

कोपरगावात आजपासून “शिवसेना” ठाकरे  गटाचे ‘भगवा सप्ताह’ अभियानास सुरुवात

“Shiv Sena” Thackeray group’s ‘Saffron week’ campaign starts in Kopargaon from today

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat10 Aug 15.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना गावखेड्यात जावुन शिवसेना सदस्य नोंदणी, नवीन शाखा स्थापना तसेच शाखा नूतनीकरण, रिक्त पदांच्या नेमणुका, बुथ यंत्रणेचा आढावा घेण्याच्या सुचना मातोश्रीवर झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.

त्या अनुषंगानेच शिर्डी मतदार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व शिवसेना नगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार(१०) पासून कोपरगाव तालुक्यात  “भगवा सप्ताह” अभियानाची सुरुवात झाली आहे  ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट पर्यंत हे अभियान सुरू रहाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना रावसाहेब खेवरे म्हणाले कोपरगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे लोकसभेपासून कोपरगावच्या शिवसैनिकांनी एकीची वज्रमुठ बांधली आहे ती काल परवा झालेल्या निर्धार मेळाव्यात सुद्धा दिसून आली शिर्डी लोकसभेला ठाकरे शिवसेनेचा खासदार जिंकला  आता विधानसभेला ठाकरे शिवसेनेचा आमदार जिंकू असा आत्मविश्वास  खेवरे यांनी व्यक्त केला. 
 खेवरे पुढे पुढे म्हणाले मात्र यासाठी प्रत्येक पंचायत समीती गणात जावुन जेष्ठ शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. त्याचबरोबर गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक या सूत्राप्रमाणे नवीन शाखांची स्थापना, शाखा नूतनीकरण करून सदस्य नोंदणी केली जाणार आहे तसेच विधानसभा क्षेत्रातील नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार असून प्राधान्यक्रमाने मतदार यादी तपासून त्यातील त्रुटी दुरुस्त कार्यक्रम देखील राबविण्यात येणार आहे.पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्य काळात राज्याच्या शेतकऱ्यांना कर्ज माफी, शेती मालाला दिलेला भाव, विविध लोकहितार्थ राबविल्या गेलेल्या योजना व घेतलेले निर्णय, कोरोना काळातील महाभयंकर सकंटावर केलेली नियोजनबध्द मात, या सर्व लोकोपयोगी कार्यांना उजाळा देण्यात येणार आहे.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले  घटनाबाह्य सरकारकडुन राज्यात सुरु असलेली हुकुमशाही जाती पातीच्या नावावरील भेदभाव व आरक्षणाच्या नावाखाली जाती जाती मध्ये तेढ निर्माण करणे, याविषयी या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने घरोघरी जावुन शिवसैनिक व पदाधिकारी व्दारा जनतेसमोर वाचा फोडुन या ढोंगी सरकारचा फडदाफाश करुन जनतेला जागृत करण्यात येणार असून ११ ऑगस्ट रोजी तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन  या भगवा सप्ताह ची सांगता केली जाणार आहे.
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, प्रमोद लबडे,श्रीरंग चांदगुडे, माजी  तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, सुनीलभैया तिवारी, शहर प्रमुख सनी वाघ, कालुअप्पा आव्हाड, भरत मोरे,असलम शेख, कलविंदरसिंग दडीयाल, गगन हाडा,  मनोज कपोते, , रवी कथले, इरफान शेख, शेखर कोलते, सिद्धार्थ शेळके, नीतीश बोरूडे , मुन्नाभाई मन्सुरी, संजय दंडवते, अतुल काले, रंजन जाधव,मधु पवार, गिरधर पवार, राजू शेख, आशिष निकुंब, संदिप देवरे, शुभम आढाव, सबिन आढाव, मधु पवार,  बाळासाहेब साळुंके, बालाजी गोर्डे,   राहुल देशपांडे, गणेश जाधव, अल्ताफ  शेख, वसिम पटेल, माघव आहेर, किरण पहिलवान, राजू हारणे, श्रीकांत  बागल, महेश गायकवाड, नितीन घुगे , तुषार  आढाव, किरण आव्हाड,  साहेबराव काळे, राजेंद्र नागजाड, रंगनाथ गव्हाणे, विवेक कुलकर्णी, कृष्णा आहेर,शैलेश खालकर,विजय गोर्डे,  बाळासाहेब वाकळे, अनिरुद्ध जगदाळे, चेतन पोटे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे पीए शंकर  सिनगर आदिसह भगवा सप्ताह अभियानात शिवसेना, युवासेना, महिला आघाडी युवतीसेना चे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित  असल्याचे देखील  शहरप्रमुख सनी वाघ यांनी सांगीतले आहे.

चौकट 

शिवसेना ठाकरे गटाच्या भगवा सप्ताह अभियानात फॉर्म भरण्यास सुरुवात होताच मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी आपले फॉर्म भरले यावेळी त्यांच्यात एक वेगळाच उत्साह दिसून येत होता. यावेळी ७९ वर्षाचे हरिभाऊ बंड यांनी देखील आपला फॉर्म भरला

Leave a Reply

You cannot copy content of this page