कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी कोपरगांवमध्ये डॉक्टरांचा एक दिवसाचा बंद
KOLKATA Convict-murder dialogue One-day strike by doctors in Kopargaon
मारेकऱ्यांना अटक करा, निषेध मूक मोर्चाArrest the killers, protest silent march
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sat17 Aug 15.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरात संतापाची लाट; कोपरगावमध्ये डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद ठेवून निषेधार्थ मूक मोर्चा काढला व मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या, या मागणीचे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
९ ऑगस्ट रोजी, एका सरकारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये मृतिका आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील चेस्ट मेडिसिन विभागाचे दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थीनीची बलात्कार करून निर्घूण हत्या करण्यात आली आहे.या घटनेच्या निषेधार्थ कोपरगांव येथे शनिवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी इंडियन मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, निमा, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यावतीने एक दिवसाचा बंद पाळून शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून अहिंसा स्तंभ मार्गे तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक व वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आले. नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी सदर निवेदन स्वीकारले
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. मयुर तिरमखे, सचिव डॉ. संकेत मुळे, डॉ. योगेश लाडे, डॉ. संजय उंबरकर डॉ. गोवर्धन हुसळे, डॉ. अजेय गर्जे, डॉ. गोविंद भोसले, डॉ. विलास आचारी, डॉ. वर्षा झंवर, केमिस्ट असोसिएशन चे गणेश वाणी, राजेश श्रीमाळी, तुषार गलांडे, डॉ. संदीप मुरुमकर यांनी निषेधार्थ मनोगत व्यक्त केले. या मूक मोर्चात कोपरगाव शहर व तालुक्यातील महिला व पुरुष डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थित सर्व डॉक्टरांकडून मयत निवासी महिला डॉक्टरला श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाची सांगता झाली.
Post Views:
195





