सण येत आहेत, ह्या सणासुदीत स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करा व आपली स्थानिक बाजारपेठ बळकट करा.- सौ. रेणुका कोल्हे
Festivals are coming, buy only from local traders and strengthen your local market during this festival.- Mrs. Renuka Kolhe
एक राखी जवानांसाठी स्टॉलचे उद्घाटनInauguration of a stall for Rakhi jawans !
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sun18 Aug 9.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : आजकाल आपल्यापैकी अनेकजन ऑनलाईन शॉपिंग करत आहेत, परंतु ज्या वस्तू कोपरगावच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत त्या वस्तूंची खरेदी ऑनलाईन ऐवजी शहरातील दुकानांमधून केल्यास शहराचा व्यापार वृद्धिंगत होईल तसेच अनेकांच्या हाताला काम मिळेल. तरी सण येत आहेत. ह्या सणासुदीत समस्त कोपरगावकरांनी आपल्या स्थानिकच्या दुकानांमधून खरेदी करावी.असे आवाहन रेणुका कोल्हे यांनी शनिवारी केले. याची सुरुवात “एक राखी जवांनासाठी” घेऊन करावी असेही ते म्हणाल्या,
रक्षाबंधन या पवित्र सणासनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या “एक राखी जवानांसाठी” या उपक्रमांतर्गत राखी जमा करण्याच्या स्टॉलचे उद्घाटन सौ रेणुका कोल्हे यांनी शनिवारी केले त्यावेळेस त्या बोलत होत्या. थेट सीमेवर जाऊन जवानांना राखी बांधण्याच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या उपक्रमास दरवर्षी हजारो महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
रेणुका कोल्हे पुढे म्हणाले सीमेवर लढणारे जवान असो की बाजारपेठ फुलविणारे स्थानिक लहान-मोठे व्यापारी असो प्रत्येक जण आपल्या परीने देश सेवा करीत असतो. राष्ट्र पुढे नेण्यात दोघांचेही योगदान मोलाचे असते. आपल्या परीनेही आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे सैनिकांचा त्याग मोठा आहे.त्यांना आपण नागरिक म्हणून प्रेरणा देण्याची गरज आहे.आम्ही सर्व आपल्या सोबत आहेत आणि तुमच्या राष्ट्रनिष्ठेची आम्हाला जाणीव आहे या भावनेने राख्या पाठविल्या जात असून महिला भगिनींनी मोठ्या संख्येत राख्या जमा कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी बाळासाहेब नरोडे,संजय होन,भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, राजेंद्र सोनवणे,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे,गोपीनाथ गायकवाड, सौ.विद्या सोनवणे,लक्ष्मी होन,उषाताई होन,अनिता गाडे,वैशाली साबळे,शुभांगी लहारे,रुपाली नेटारे,अपूर्वा डोखे,सरला नेटारे,किरण सूर्यवंशी,जयप्रकाश आव्हाड,साई नरोडे, रोहित कणगरे,सतीश रानोडे,खालीक कुरेशी, फकीर महमंद पहिलवान,रोहन दरपेल,अमोल बागुल,सुजल चंदनशिव, अभिजित मंडलिक, अजय शार्दुल आदींसह युवा सेवक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
स्थानिक बाजारपेठेत राख्या खरेदी करून सौ.रेणुका कोल्हे यांनी ऑनलाईन खरेदी टाळून आपल्याच स्थानिक दुकानात खरेदी करा त्यामुळे बाजारपेठेला हातभार लागतो आणि लहान दुकानदारांचा देखील सण गोड होण्यास मदत होते स्थानिक बाजारपेठेला महत्व देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Post Views:
50