ऑनलाईन नको, स्थानिक विक्रेत्यांकडूनच खरेदी करा – सौ.चैताली काळे

ऑनलाईन नको, स्थानिक विक्रेत्यांकडूनच खरेदी करा – सौ.चैताली काळे

Don’t buy online, buy from local vendors only – Mrs. Chaitali Kale

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sun18 Aug 18.30 Am.By सालकर राजेंद्र

 कोपरगाव  :- आपल्या संस्कृतीप्रमाणे वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. या सण उत्सवाच्या वेळी त्या त्या सणाला बाजारपेठा सजल्या जातात. त्या वेळी स्थानिक विक्रेत्यांकडूनच सणाचे साहित्य करावे असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैताली काळे यांनी केले आहे.

भावा बहिणीच्या पवित्र नात्याची साक्ष देणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त सौ.चैताली काळे यांनी चिरंजीव आयांश सोबत कोपरगावात राख्या, मेहंदी आदी साहित्याची खरेदी केली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, श्रावण महिन्यापासून विविध सण उत्सवांना सुरुवात होत असून दिवाळी पर्यंत विविध सणांसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची दुकाने स्थानिक छोटे मोठे व्यावसायिक थाटत असतात. स्थानिक ग्राहकांनी त्यांच्या दुकानात खरेदी करावी अशी माफक अपेक्षा या छोट्या मोठ्या व्यावसायिकांची असते. परंतु सध्या ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे ऑनलाईन खरेदीकडे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. त्याचा फटका स्थानिक बाजारपेठेला बसत असल्यामुळे या स्थानिक व्यावसायिकांच्या मालाची विक्री कमी होऊन पर्यायाने त्यांचे आर्थिक नुकसान होते.

ऑनलाईन खरेदीसाठी नागरिकांना विदेशी कंपन्या अनेक आमिष दाखवतात त्यामुळे कधी कधी तर ऑनलाईन खरेदीमुळे फसवणूक सुद्धा होते. हि फसवणूक टाळण्यासाठी व आपल्या बाजारपेठेला उभारी देण्यासाठी स्थानिक व्यावसायिक हे आपलेच भाऊ-बहीण आहेत या भावनेतून नागरिकांनी ऑनलाईन खरेदी टाळून स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानातच खरेदी करावी असे आवाहन यावेळी सौ. चैताली काळे यांनी केले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page